म्हणणे लादत नाही.....
बर गं हे ना म्हणणे.....
आपल्या माणसांकडेच का गं.....
अपेक्षांचे वादळ ते वळणे.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
लादत नाही म्हणणं तुझ्यावर....
एक पण सांगू का रे ....
तूझ्या आनंदात माझ रे सुख....
समजून घेशील तर मागू का रे ...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
तु का नाही समजून घेत ....
माझे गं म्हणणे.....
लादत नाही तरी आवडत नाही .....
हट्टाने तुझे ते अडणे...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
जे माझे आपले......
सहज मला रे समजून जातात.....
लादावं म्हणणं माझं.....
वेळ अशी कुठे ती येऊ देतात....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
नाही रे लादणार.....
माझं म्हणणं तुझ्यावर.....
बंधन घालणे काय.....
हा, त्रास खुपदा झाला मनावर.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
का नाही समजून घेत ....
तु माझं म्हणणं.....
लादाव असं नाही रे....
माझ्या नात्यांना जपणं...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
नातं हे लादण्यासाठी....
असतं का कुठे.....
हक्क आहे समजून घेण्याचा....
प्रश्न म नसतो पूढे....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
का नाही समजून घेत....
लादलेल मनावर.....
लवकर कुठे मीटतात....
घाव ते पुसल्यावर....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
समजून घेतले असते तू.....
तर म्हणणे मी लादले असते....
नात्यातले हे हक्क....
कर्तव्यातून जागले असते.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही.... ✍️✍️
अप्रतिम रचना👌👌👌👌👌👌
ReplyDeleteKhupch sundhar apratim rachna 👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻💐💐💐💐🍫🍫🍫🍫🍫
ReplyDelete