निरागसपणा हरवला आणि....
सुटला खेळ बाहुला बाहुलीचा....
जीवनाचा सार एकच रे.....
भासे आधार ही आता सावलीचा.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
विचार उधळण्याची.....
आहे चंद्राला खोड गं.....
रमतो तो चांदण्यात आणि ......
म्हणतो रोहीणी तूझी मला ओढ गं.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
विचार तूझे....
कर्तृत्वात गं बांधून घे....
छळू नको स्वतःला ....
गुपीत जगण्याचे जाणून घे...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
मीच मला छळायचं नाही .....
खूपदा रे ठरवते.....
तुझी आठवण येऊन म.....
सहज मला हरवते...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
कितीदा असं .....
मलाच मी रे छळलेल....
उधळावे की जपावे विचार.....
कोड्यात जेव्हा मन हे पडलेल.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
तुझ्या विचारातुन.....
तु उधळणार नाही ना मला.....
या विचारानेच रे.....
कितीदा छळले मला....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
विचार सारे
झिम्मा ते खेळतात
हो छळतात
विचार सारे
कृतीचा म्हणे पाया
सांभाळ राया
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
खूपदा मलाच मी....
छळले असे....
भेदभावाचे गणीत....
सोडवू गं कसे....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
आवडत नाही मला....
स्वतःला तू गं छळलेले.....
उधळून दे ते सारे विचार....
डोळ्यातून असता जे गळलेले....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही.... ✍️✍️
अप्रतिम खूपच छान रचना👌👌👌👌👌
ReplyDeleteअप्रतिम रचना
ReplyDeleteKhup khup khup chan ✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻👌👌👌👌👌👌👌
ReplyDeleteखूपच सुंदर
ReplyDelete