अनोळख्या वाटेवर गं .....
पाऊल सावकाश टाकायचे.....
ध्येय नाही गं गाठणे कठीण.....
सोबत अनुभव ही साठायचे.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
अनोळखी वाट.....
चालून गं तू पहा.....
जोडेन गं कुठेतरी.....
आश्वस्त तु रहा....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
अनोळख्या वाटेवर .....
अडखळले रे पाऊल.....
येना लव करच.....
लागली तूझी चाहूल....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
ऊन सावल्यांच्या खेळात ....
अनोळखी ही वाट.....
अपरिहार्य चालणं ना.....
जीवनाचा हा कठीण घाट..
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
सोबत मागू का रे.....
दिशाहीन वाऱ्याची.....
सवय नाही ना चांगली.....
नेहमी ती आधाराची....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
अनोळख्या वाटेवर .....
चालून का रे पाहू......
सोबती तु असशील .....
विश्वासावर का या राहू....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
वारा हा दिशाहीन....
बंधनात रहात नाही ...
त्याच्या भरवश्यावर मी....
वाट धुंडाळत नाही ...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
जो स्वतःच दिशाहीन. .....
सोबत तो काय देणार.....
अनोळखी वाटेचा.....
पर्यायच कामी येणार....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
दिशाहीन वाराही....
सोबतीचा वाटला.....
त्याचा स्पर्शाने उगाच....
भास तूझा जागला....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
अनोळखी वाटेवर ....
चालून का रे पाहू....
प्रवाह विरूध्द असं....
एकदा का जगून पाहू....
...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
अनोळख्या वाटेवर.....
असाच तु ही भेटलेला.....
गतजन्मीचे ऋणानुबंध म्हणत.....
ओळखीचा वाटलेला....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
अनोळखी वाट.....
ओळखीची भासेल......
तु फक्त प्रयत्न कर....
तीही बघ हसेल.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही..... ✍️✍️
अप्रतिम...खुप खुप सुंदर...����������������������������������������������������
ReplyDeleteअतिशय सुंदर 👌👌👌🍁🍁🍁📝
ReplyDeleteKhupch sundhar di 👌👌👌👌👌👌✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻
ReplyDeleteअप्रतिम रचना👌👌👌👌👌
ReplyDeleteअतिशय सुंदर
ReplyDelete