बालकडू गं दिले जपण्याचे......
तमा नाही बाळगली कस म्हणणार......
स्वतःची तमा नाही केली म्हणेन हवतर.....
पण नातं नाही गं कुठलही हरणार.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
लैला मजनू सारखं.....
आपलं प्रेम गं असाव.....
जखम तूला होता......
वेदनेने मी गं विव्हळाव....
असा गोड सखा असतांना......
व्देश कसा मनात गं फिरकावा.....
तमा नाही बाळगत जगाची कधी......
सांगावा सांग गं त्याला हा आधी.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
तमा कशाची
मी बाळगली नाही
बोलते काही
तमा कशाची
नको न कधी करू
नको गं हरू
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
परकी म्हणून छळली.....
म द्वेष कुणाचा रे करायचा ......
तमा नाही बाळगली कसली.......
अपरिहार्य रे मार्ग हसत हसत जगायचा.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
किती छान होता रे तो......
कट्टी बट्टी चा ना खेळ.......
व्देश मनात धरू नका.......
सांगायची कधी नाही ना आली वेळ ......
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
सुर्य आणि समुद्राने.....
कधी तमा न बाळगली......
क्षमता असूनही मर्यादेत रहाण्याची......
कला निसर्गाने सहज ना सांगीतली...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
तमा बाळगत नाही ती कसली....
व्देश ही मनात धरत नाही.....
आई च आहे ना जी कधी.....
कुठेच उणे पडत नाही .....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
तमा, नाही बाळगली कसली....
अनाथांची झाली आई....
व्देशालाही प्रेमाने जींकले.....
अशी माझी सिंधुताई.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही.... ✍️✍️
अप्रतिम रचना खूप छान👌👌👌👌👌👌👌
ReplyDelete👌👌👌
ReplyDeleteखूप खूप छान
ReplyDeleteKhup khup khup chan👌👌👌👌👌👌👌
ReplyDeleteअप्रतिम लेखन🌹🌹🌹
ReplyDelete