जुनी आपुलकी मनामध्ये .....
सरणावरही रे जपेल......
तुझ्या सुखाच्या उमेदने .....
भेट तुझीच दूर सारेलं......
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
तुच तर गं उमेद घराची....
हे तू जाणते ना!!......
भांड्याला भांड लागता आवाज होईल.....
जून्या आपुलकीने जपशील नाती मानते ना!!....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
उमेद म्हणजे काय.....
सहज तो पुसून गेला.....
ग्रहणानंतरचा हसरा चंद्र.....
हळूच त्याला गं दाखवून दिला.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
आपुलकी जुनी.....
नको शोधू कोणात....
तू तीला जपाव.....
असूदे गं ध्यानात ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शब्दफूलांची भेट.....
तुच दिलेला ना ठेवा......
सांगावा देण्याची उमेद हीच....
नको मार्ग दुसरा .रे हवा....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
उमेद नवी
असावी ग मनात
आहे ध्यानात
उमेद नवी
तूझ्यात गं दीसते
गोड हसते
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
रात्रीच्या पल्याड.....
उमेदीचा ग सुर्यप्रकाश......
आपुलकी असता सोबती.....
नात्यात बहरतो विश्वास ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
उमेद नवी असतेच.....
अपेक्षाही का चोरपावलांनी याव्यात....
आपुलकी ची परीक्षा अशी.....
दुनियादारीत कितीदा द्याव्यात....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
उमेद असता सोबतीला .....
हार ती होत नाही.....
आपुलकी जपता मनात.....
खंत कसली रहात नाही ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
आपुलकीने वेड्या मनात.....
स्वप्न वेगळे रचले होते.....
मी त्याची उमेद असल्याचे....
भास गं सारे फसले होते.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
दुःखाचे मळभ सार तू दूर....
असेन नेहमी रे मी सोबतीला....
इंद्रधनुष्य होऊन उमेद देईन....
आजन्म रहीन रे संगतीला....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही.... ✍️
अप्रतिम फारच छान रचना👌👌👌👌👌👌
ReplyDeleteखूपच छान रचना....👌✍️👍🍫
ReplyDeleteअतिशय सुंदरच
ReplyDeleteKhupch sundhar apratim👌👌👌👌👌👌👌👌
ReplyDelete✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻💐💐💐💐💐💐💐🍫🍫🍫🍫🍫🍫
Apratim rachna khup chan👌👌👌👌👌
ReplyDelete✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻💐💐💐💐💐💐🍫🍫🍫🍫