रोज तो आदित्य बघना.....
उमेद जगण्याची घेऊन येतो.....
मावळतीला जाता आपुलकीने.....
उद्या छानच असेल आस ही ठेउन जातो....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
तूझ्यात आपूलकी.....
गतजन्मीची रे वाटली....
उमेद वेड्या मनी.....
जगण्याची होती जागली.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
उन सावल्यांचा खेळात ....
उमेद ही गं नवी असावी.....
जुनी आपुलकी ही......
सोबतीने ग हसावी....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
उमेद ही नवी असावी.....
आपुलकी ही जुनी असावी.....
आयुष्याच्या गणिताची सुत्र.....
इतकी सहज खर का असावी....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
उमेद आणि भ्रम.....
फरक आता कळलेला.....
आपुलकी जुनी गोड तरी.....
अविश्वास नात्यातला छळलेला.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
खेळ अपेक्षांचे...
कुठे नियमात बसतात.....
सगळ्यांना आनंदी ठेवण्याचे....
प्रयत्न नेहमी रे फसतात.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
कट्टि बट्टीच्या खेळाचे...
नियम कुठे कळले.....
निरागस पणा हरवण्याला....
दूनियादारीचे खेळ रे छळले...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
सांजवेळ होताच गं सखे सुरू होतो.....
तुझ्या आठवणींचा खेळ जूना.....
मनाच्या दारावर....
ठेऊन जाते तूझ्या आठवणी पुन्हा ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
उन सावल्यांचा खेळ ....
जगण शिकवून गेला...
उगाचच अर्थ सारे ...
समजावून हे ही गेला...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही.... ✍️✍️
अतिशय सुंदर रचना👌👌👌👌👌
ReplyDeleteवा वा सर्वच रचना सुंदरच
ReplyDeleteव्वाऽ
ReplyDeleteखूपच छान 👌
आबा
🙏
Khupch sundhar lihale👌👌👌👌 💐💐💐💐🍫🍫🍫🍫
ReplyDelete