गूढ अंतरीचे....
शब्दावाचून कळावे....
संवाद असे मनीचे....
अबोल्यातूनही घडावे...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शरणागती पत्करली मी.....
तुझ्या आठवांपुढे.....
संवादाची पताका तुझी हवी ....
जाणते व्यस्त ना तु पोटापाण्याच्या प्रश्नांपुढे....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
संवाद पताका कधी कधी.....
भावनांशी ही साधून घे.....
शरणागती पत्करावी लागणार नाही .....
याची रे ही हमी घे.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शरणागती नको न पत्करावी तू.....
मान तू रे माझा.....
तूझ्या संवादाच्या पताकेतच....
गुंतलायना ना श्वास माझा ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शरणागती पत्करण.....
कधीकधी हिताच गं ठरत....
वाद तर संपतो पण.....
चुकीची जाणीव प्रेमाने देणं ही घडतं...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
संवाद हा नात्यातला सेतू .....
नको कधी तो हरायला....
जपून कर ही शब्दांची पेरणी......
काटे नको ग उगवायला.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
संवादाची पताका ....
खुपदा ती फडकते.....
शरणागती घेते जेव्हा .....
उशीरा भेटीला धडकते....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शरणागती पत्करावी.....
अशी वेळ कुठे तो येऊ देतो.....
कितीही चुकली तरी तो......
सांभाळून असही घेतो....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
नातं हे युध्द नाही गं सखी....
शत्रू होऊन शरणागती पत्करायला.....
ज्याला आपलं मानलं त्याच्यासाठी ...
सोप की गं मीपण हरायला....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
दिव्य आहे गं वेडू.....
रुसल्यावर मनवणं तूला.....
मी शरणागती पत्करली ....
समजून घेना मला....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
संवादाची पताका.....
सवयीची तीची झालेली.....
शरणागती पत्करली मी.....
जेव्हा ती अबोल्यात गेलेली....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही.... ✍️✍️
Khupch sundhar👌👌👌👌👌 💐💐💐🍫🍫🍫
ReplyDeleteअतिशय सुंदर रचना👌👌👌👌👌
ReplyDeleteअप्रतिम....खुप खुप सुंदर....👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻💖💖💖💖💖🍫🍫🍫🍫🍫🌹🌹🌹🌹🌹🌹
ReplyDelete