जागी का स्वप्नी....
कळूनही ना कळले.....
मनाच्या खेळात बघ ना.....
जगणेच रे हरले....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
कसं रे रूळाव.....
आभासी या जगातं .....
मृगजळ हे सारं.....
आलं की ध्यानातं....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
दुनियादारी ने आता .....
पोक्तपण बहाल रे केले.....
आभासी स्वप्नांच्या जगात.....
जागणे रूळणे मनाने सोडून दिले....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
जागेपणातील स्वप्न तू....
असचं रे वाटलेलं.....
आभासी जगाने होतं....
स्वप्न हे ही थाटलेल....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
हळूच म्हणून गेली ती.....
येते रे स्वप्नात .....
रात्रभर जागलोच.....
असा ही गं स्वप्नात .....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
आभासी या जगात.....
कसं रे मी रुळावं.....
तुझ्या भासांनी तुझ्या....
पाऊलखुणांना रे गीळावं....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
नाही रे रुळत मी.....
आभासी या जगात....
फुलांच्या भासात खुपदा.....
काटेच रुतले रे मनात....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
आभासी या दुनीयेत....
मन काही रे रूळेना.....
जागी का स्वप्नी.....
कोड काही सुटेना....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
प्रत्येक का चं उत्तर .....
खरच आलं असतं द्यायला....
छळला नसता प्रश्न ....
का म्हणून यायला....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
जागी का स्वप्नी .....
आता होते कळले.....
आभासी या दुनियेने......
असेही होते छळले......
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही... ✍️✍️
अतिशय सुंदर रचना👌👌👌👌👌
ReplyDeleteअप्रतिम....अतिशय सुंदर...👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻💖💖💖💖💖🌹🌹🌹🌹🌹🍫🍫🍫🍫🍫
ReplyDeleteApratim rachna khup chan👌👌👌👌 ✍🏻✍🏻✍🏻✍🏻💐💐💐💐🍫🍫🍫
ReplyDelete