झाले गेले सारेच क्षण
निरोप गं द्यायला आलेले
सरता वर्षे पलिकडे गेला
अपरिहार्य गं जाणे आम्हा झालेले
काही क्षण आठवणी गोड
जाता म्हटले ठेव गं ओढ
काही क्षण होते रडत
उणीव जाणार्यांची होते गाळतं
काहि क्षण डोळ्यांमागे
हसत अलगद लपून गेले
कसे न सांगू गोड गुपीत
आपले असे जपून नेले
काहि क्षण मिठी घेऊन
आनंद अश्रृ गाळत गेले
काही क्षणांना हाथ जोडूनी
माफ करा मी म्हणत गेले
सरत्या वर्षाने जाता जाता
अनुभवाचे गाठोडे सोडून दिले
ऋणानुबंधानी मन भरून
नववर्षाचे स्वप्न देऊ केले
झाले गेले होते सोडायचे
असे आठवात उरून गेले
क्षण सारे कुठे गं सुटता
आठवांच्या कोंदणात दडून गेले
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही..... ✍️✍️
Wah wah khupch mast rachna khup khup chan 👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻🍫🍫🍫🍫🍫💐💐💐💐💐💐💐
ReplyDeleteवाह....मस्तच रचना...खुप खुप सुंदर 👌👌👌✍️✍️✍️✍️
ReplyDeleteअतिशय सुंदर रचना👌👌👌👌👌
ReplyDelete