गैरसमजांचे चढ उतार.....
येतील रे सख्या जीवनात.....
भीती नको वादाच्या वळणांची.....
सांभाळेल रे मी खात्री ठेव मनात....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
नको गं भीती मनात.....
तारुण्याच्या त्या वळणाची.....
चढ उतारावर तोल धर...
भीती नाही गं म हरण्याची...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
चुकेल मी खुपदा....
सावरून तुलाच रे घ्यावं लागेल....
विरहाचं वळण नाही ना येणार....
वादा ही तुलाच रे द्यावा लागेल....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
जीवनाचा मार्ग कठीण....
कधी उतार कधी चढ ठरलेले.....
मला भीती वळणाची वाटताही.....
गतीमान रहाण्या धडपडीत रूळलेले....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
जगण्याची दिशा.....
भीती वाटणारी वळणे रे ठरवुन जातात....
प्रत्येकाच्या आयुष्यात अशी.....
धोक्याची वळणे येउन जातात.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
प्रवासाची ईच्छा ही.....
नको कधी हरायला.....
भितीदायक वळणे येतीतच......
असाव आपलं कुणी सोबती चालायला....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
उन सावल्यांच्या खेळात.....
चढ उतार रे ठरलेले.......
वळणाची ती भीती मनात .....
अचानक येउन छळलेले....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
आठवतेना ते वळण.....
आजही भीती दाटून देतं.....
चढ उतार हे ठरलेले होते.....
येण त्यांच अपरिहार्य होतं....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
वळणाची होती भीती मनात .....
आणि वळणावर तू भेटलेला.....
नियतीचा हा खेळ मनाला .....
होता उशीरा तो कळला.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही.... ✍️✍️
एक नंबर जबरदस्त....शाही...👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻💖💖💖💖💖🍫🍫🍫🍫🍫🌹🌹🌹🌹🌹
ReplyDelete