18 January 2022

संघर्ष। 18/1/2022

कर्तव्य  पूर्ण करण्यासाठी .....
ध्येयाचा कधी बलिदान जातो.....
असाही संघर्ष  जीवनात.....
समर्पण शिकवून जातो ....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

ज्यांनी पाहीला संघर्ष  तुझा....
त्याला  किंमत यशाची तूझ्या.....
बाकी म्हणतील भाग्यवान  तु.....
जगरहाटीचा खेळ  असा.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁


ज्यांनी पाहीला संघर्ष  तुझा....
त्याला  किंमत यशाची तूझ्या.....
बाकी म्हणतील भाग्यवान  तु.....
जगरहाटीचा खेळ  असा.....

कर्तव्यांनाच ध्येय केल.....

संघर्ष  गोड  म वाटत गेला.....
माझ्या  माणसांच्या  चेहर्‍यावर ....
आनंदात तो दाटत गेला ......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

पानझडीशीवाय झाडाला.....
नविन पालवी कुठे  फुटते.....
ध्येयप्राप्तीसाठी संघर्षाशीवाय.....
पर्याय कुठे रे उरते.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

ध्येय  तुच रे वेड्या......
शब्दफुलेही ग्वाही देतील.....
संघर्ष ठरलेला सरणापर्यंत.....
श्वासांच कर्तव्य राहील नाव  तुझच  घेतील....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

संघर्ष  तर रोजचाच.....
पण भास तुझा  हसला होता.....
असाही कधी कधी तु.....
कर्तव्य  म्हणून  सोबती दिसला होता ....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मन दुखावुन कुणाचं......
ध्येय  नको  प्राप्त  करू.....
संघर्ष गरजेचं रे.....
पण माणूसकी नको लुप्त  करू....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तीच्या संघर्षाचं गणीत.....
कुठे मांडता आलं.....
कळलच नाही  तिच्यासाठी.....
कर्तव्य आणी ध्येयात काय सरस झालं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

निसर्ग  नियमांची.....
उगाच केली पायमल्ली .....
ध्येय  ठेऊन वृक्षरोपणाचे.....
कर्तव्य करू पुर्ण  होऊन वृक्षवल्ली ....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

असतील सोबतीला खूप .....
संघर्ष  तुझा तुलाच रे करायचा.....
नको शोधू  आधार कुणाचा....
आत्मविश्वास  रे हरायचा.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                           शाही... ✍️✍️


1 comment:

  1. अतिशय सुंदर रचना 👌👌👌💐💐💐💐

    ReplyDelete

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...