मैत्रीत ही विश्वासासाठी......
अग्नीपरीक्षा का रे द्यावी लागेल....
अशी काय हमी असावी.....
कि विश्वास ठेव हे सांगाव न लागेल....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
देवत्व नसेल मैत्रीत तरी....
माणुसकीला नको रे पारखी....
अनंत राहू दे मैत्री.....
कृष्ण आणि सुदामा सारखी....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
आहे ना रे विश्वास तुझा.....
आपल्या वेडू मैत्रीवर.....
अनंत राहु दे नातं.....
मी अनंतात विलीन ही झाल्यावर....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
नेहमी दुःखाच्या क्षणी....
सुखाची मैत्रीच हमी असते.....
संकटात साथ सोडणार नाही....
अबोल अशी ती खात्रीच असते....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
विश्वास, आधार, आपुलकीच....
दुसर रूप ना रे मैत्री.....
स्वखुशीने अल्लाह ने दिलेला.....
एक गोड फरिश्ता याचीच खात्री....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
विश्वास, आधार, आपुलकीच....
दुसर रूप ना रे मैत्री.....
स्वखुशीने अल्लाह ने दिलेला.....
एक गोड फरिश्ता याचीच खात्री....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
अनंत राहूदे .....
नाते मैत्रीचे ......
ऋणानुबंध असे......
जणु धागे गतजन्मीचे ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
मैत्री ती मैत्री.....
खरी खोटी कशी असावी ....
विश्वास जपावा ही....
संस्कार ची रित दिसावी....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
मैत्रीत कुठे असते....
दुनियादारी .....
अलिखित विश्वासाची.....
हिच दुनिया न्यारी.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
भाग्यवान ते.....
खरी मैत्री ज्यांना लाभते....
विश्वास राहूदे सांगायची....
गरज कुठे मैत्रीत लागते....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
निर्बंध हे नातं मैत्रीच....
का त्याला बंध घालावे....
नाही त्याला आपल्या सारखे....
बंधनांचे जग पेलावे.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही..... ✍️✍️
सर्वच रचना अतिशय सुंदर 👌👌👌👌💐💐💐💐
ReplyDelete