21 January 2022

चारोळी संग्रह... 20/1/2022

तुझ्या  फक्त  विचारानेही....
हसु खुलत गं चेहर्‍यावर ....
कशी गं जमते जादु  तुला.....
राज्य आजही वेडु तुझं मनावर....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तुलाच दिले होते  हक्क......
अश्रृ  पुसता हसवण्याचे......
तुलाच पहाता जागले स्वप्न.....
सुखस्वप्नील  जीवनाचे......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

गोड  आस आजही माझी.....
छान  ती हसवत असते.....
मनात त्याने आजही जपलय म्हणता.....
भेटीचे गोड  स्वप्न  जगवत असते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तुच आहे  सखी.....
स्वप्नांना माझ्या  जागवणारी....
व्यक्त  शब्दफुलात करून.....
मला गं हसवणारी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तुच तर आहे  आई......
वादळे माझी शमवुन  हसवणारी......
करशील तु अवघड नाही  तुझ्यासाठी.....
म्हणता स्वप्नांना गं जागवणारी......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

हसवण रडवण सोडून  दे.....
शब्द  तुझे फास रे होऊन जातात.....
उगाच भ्रमात  जगत होते.....
चुका अशा ही जगवून जातात....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तुलाच  जमत.....
मला रे हसवायला.....
निराशेच्या अंधाराला दुर करून.....
स्वप्नांची नवीन पहाट फुलवायला.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आज तो उगाचच  म्हटला....
तुच मला हसवणारी.....
कळली नाही भाषा.....
चुका माझीभुलवणारी.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आवडेल मला.....
तुझ हसु व्हायला......
तुझी स्वप्न  होऊन.....
डोळ्यात तूझ्या  रहायला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नेहमी  असेल दुआ......
तु नेहमीच  हसत रहावा.....
तुझ्या  आनंद  आणि  स्वप्नात.....
कणभर अस्तीत्व माझा पहावा.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

हसवणारी आहे  का नाही  माहीत .....
पण  रडवणारी तुला नाही  व्हायच.....
खूपदा चुकली माफ करशील मनाने....
हे सल आता नाही  रे जायचं.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                  शाही.... ✍️✍️


1 comment:

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...