कवेतही तुझ्या ......
अश्रृ तीची गळली....
अबोल निशेच्या हुंदक्यातली....
वेदना तूला कधी न कळली...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
आवडते मला गं....
नजरेआडुन तुझे ते बोलणे....
जणु सूर्याने ढगाआडून....
लाजत प्रभा गं सांडणे...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
मावळलेला दिवस आणि .....
निशा, यायचा अवकाश....
तुझ्या आठवांचा सुरू होतो......
पाठशिवणीचा खेळ खास.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
निशा आणि प्रभा.....
सोबती आठवणींना तूझ्या....
संध्याकाळी वाट पाहील....
येशील भेटीला ना माझ्या ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
निशा असो की प्रभा सोबती .....
शब्दांच्या दुनियेत वेड मन रमतं.....
जाणतो ना तुझ्या विरहात मला....
कुठे काय रे जमतं.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
नभातला शशी......
राती राती जागतो.....
सांगना निशा तु सोबती त्याची.....
अर्थ तुला त्याचा का गं लागतो.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
आठवणी तुझ्या.....
निशेला सोबती करून जातात....
प्रभा आली भेटीला तरीही....
ह्या पाऊलखुणेत राहतात.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
ती निशा आणी शशी....
सोबतीला असतात.....
तूझे भास जेव्हा ....
उगाचच माझ्याशी हसतात.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
निशा ती सोबती येता....
नवे स्वप्न देऊन जाते.....
प्रभा ही त्यांना पुर्णत्व देण्यास....
आशेचे सुर्यकिरण घेऊन येते....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
विरहाच्या त्या क्षणी....
निशा होती सोबती.....
वाहणारे अश्रृ आणी.....
तुझ्या सोबतच्या गमती जमती.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
प्रभा ची ती लाली.....
आणी सोबतीला तूझा भास.....
किती निशा जागवल्या .....
सोबती घेऊन गोड आस....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही.....✍️✍️
Atishay sunder चारोळ्या 👌👌👌
ReplyDelete