प्रेमात पडल्यावर.....
असते अपेक्षा किमान....
जपावा नेहमी त्याने...
तिचाही मान....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शेवटचा श्वास ही.....
तुझ्या मिठीतच हवा मला....
प्रेमाची किमान अपेक्षा....
सांगायची राहीली तुला.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
कीमान अपेक्षा असते.....
प्रेमात रे पडतांना....
नकार नसावा उत्तरात.....
प्रेम आहे हे सांगतांना.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
किमान अपेक्षा असते....
प्रेमात ते पडतांना.....
काही क्षण असावे दोघांचे....
सुखद आठवणी जोडतांना....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
किमान अपेक्षा असते.....
प्रेमात रे पडतांना.....
गैरसमज नको व्हावे...
व्यक्त ते होतांना....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
किमान अपेक्षा असते....
प्रेमात ते पडतांना.....
कधी अव्यक्त राहु नये प्रेम....
मन मनाला जुळतांना....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
किमान अपेक्षा असते तीची....
प्रेमात ती पडतांना....
तीच असावी मनी ध्यानी....
संसार तो जपतांना....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
किमान अपेक्षा असते तीची.....
प्रेमात रे पडतांना.....
भावना तीच्या जपाव्या त्याने....
तीला आपली म्हणतांना....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
अपेक्षा नाही केली कधी.....
प्रेमात रे पडण्याची.....
किमान अपेक्षा नसतांना.....
जादु घडली मन जुळण्याची....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
अपेक्षा जिथे असते.....
तिथे प्रेम खर का असत.....
दुनियादारीच हे जगण....
प्रेमात बहुतेक नसतच....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
किमान अपेक्षा होती......
समजून घेणारा भेटावा.....
प्रेमात त्याच्या पडून.....
सोबतीने शेवट गाठावा....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
प्रेमात पडण हे......
ठरवुन कुठे होतं.....
किमान ओळखही नसते....
आणी अनोळखी तो जगण होतो....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही....✍️✍️
छान आहेत सर्व चारोळ्या
ReplyDeleteखुप सुंदर आहेत सर्वच चारोळ्या.... अप्रतीम...👏👏👏💐💐💐
ReplyDeleteसुंदरच रचना 👌👌👌
ReplyDelete👌👌👌👌🌹🌹🌹
ReplyDeleteअतिशय सुंदर लेखन खूप खूप छान चारोळ्या .👌👌👌🌟🌟🌟🙏🙏🌹🌹🌹🌹
ReplyDelete