27 January 2022

पहिलं प्रेम.... 27/1/2022

दुनियादारी नि कर्तव्यात.....
न भेटता जपतो इभ्रत आधी....
जपणार असं पहिल प्रेम तु माझं....
वाटतं तुला विसरण होईल कधी...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

जवळ असता भांडायच....
दुरावताच आठवायचं......
असं खोडकर पहिल प्रेम तु माझं.....
विसरण तुला नाही हं जमायचं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁



कसं विसरेन तुला....
प्रेम तु पहीलं....
त्याग आणी समर्पण.....
तुच तर शिकवलं.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁



साधारण होते मी....
खास तु बनवून गेला....
तु ते पहिल प्रेम.....
विसरणं न झाल तुला...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

किती गोड ना भावना.....
पहील्या त्या प्रेमाची......
कसं विसराव त्याला.....
जाणिव ज्याने दिली याची.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

न विसरणार असं तुझं......
पहिले प्रेम मी होती का रे.....
अपरीहार्य जगणं तुझ्याविण आता...
तरी तुझ्या उत्तरासाठी मन झुरतं का रे....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

देशप्रेमाची भावना आजन्म राहीन....
मिटणार नाही आदर  नी प्रेम.....
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक .शुभेच्छा.....
मताच्या आपल्या जाणा महत्व हिच ईच्छा....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

विसराव कसं.....
पहीलं प्रेम तू माझं.....
मीटणार नाही भावना....
श्वासाशीच जुळल नातं तूझं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

पहील प्रेम माझं.....
कस तुला विसराव.....
पाण्याविन माश्याने....
कसं बर जगाव.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मिटणार नारी रे कधी.....
भावना झाला तु अशी.....
सांगावा पाठवलाय.....
सांगेल तुला नभातला शशी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

खरच का पहील प्रेम....
कुणी नाही विसरत.....
आई बाबांच प्रेम म...
प्रेमात नाही का धरत...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अव्यक्तच राहील.....
पहीलं प्रेम माझ....
विसरणार नाही....
नाव कोरलं मनावर तुझं...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तु भावना रे प्रेमाची....
कशी ना मीटणार......
श्वास आणी स्पंदनाच नात....
सरणावर रे संपणार....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                        शाही.....✍️✍️


No comments:

Post a Comment

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...