ग्रहण तुला लागता चंद्रा.....
वाईट तुला वाटते ना रे......
सांगना अनुभव तुझा, सुरवात......
नविन करतांना मन तुझं ही दाटते का रे.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
अनुभवांची शिदोरी .....
खूपदा गं दंव्दात पाडते....
भुलवणार्यांपासुन सावध रहा म्हणतांना....
मन का तिथेच गं अडते...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
बंधनांच जग ही महत्वाच.....
अनुभवांची शिदोरी सांगेल गं तुला.....
नविन सुरूवात करतांना .....
मनात तरी जपशील ना मला.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
नाविन्याची ओढ ही....
मानवी रे वृत्ती....
अनुभवांच्या शीदोरीने.....
घडेल योग्यच रे कृती.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
नाविन्याची ओढ ही....
मानवी रे वृत्ती....
अनुभवांच्या शीदोरीने.....
घडेल योग्यच रे कृती.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
आशावादी असावं रे......
नविन सुरूवात करतांना.....
अनुभवांची शिदोरी सांगून गेली ......
थांबवण अशक्य तुला म जींकतांना......
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
तजवीज करून ठेवावी रे......
उन सावल्यांच्या खेळात......
अनुभवांची शिदोरी सांगून गेली......
नविन वळण नकळत येत रे जीवनात ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
नविन सुरूवात करायची......
रंग त्यात तु भरशील का रे.....
अनुभवाच्या शिदोरीतली......
कडवट अनुभव पुसशील ना रे......
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
अंगणात होती हसरी......
नविन कळी उमलणारी.......
आपलेच कुस्करुन टाकणार....
भीतीचे अनुभव होती अशीही छळणारी....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
संस्कारांच्या शीदोरीला गं.....
जीवनाचा पाया केलेला.....
नविन सुरूवात कठीण असताही.....
कल जिंकण्याकडेच म गेलेला....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही.... ✍️✍️
अप्रतिम खूपच छान रचना👌👌👌👌👌👌
ReplyDelete