जुनीच माझी आसवं......
म डोळ्यातुन तूझ्या का गळतात....
फसवे सारेच दुःख माझे.....
सांगना तुला का रे छळतात....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
नको रे डोळ्यांवर.....
पापण्यांचे पहारे.......
जून्या आसवांना आता.......
मुक्याने वाहू देऊ का रे.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
आसवे जुनी
किती गं छळतात
हो कळतात
आसवे जुनी
पापणीत लपली
मने जपली
आसवे जुनी
तुझीच ना रे भेट
जपली थेट
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
वयपरत्वे ते दुर्लक्षित करणं.....
फसवं हे दुःख छळत रे किती.....
फेरा हा चुकणार नाही कुणाला.....
जुन्या आसवांनी गळून सांगावे तरी किती......
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
दुःख ते दूःख.....
फसवे का लटके नाही रे मज कळले....
गणीत त्यांचे मांडता....
आसवे आजही आपसुकच होते गळले....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
आई मी सुखात गं.....
नजर चुकवून ती बोलुन गेली....
फसव्या या दुःखाने तीने......
जुनीच आसवे गोठवून दिली....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
अपेक्षाभंगांचे फसवे दुःख ......
अपुर्णत्वाचाच शाप त्याला......
जुन्या आसवांना गळतांनाही.....
का नाही याचा भास झाला .....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही... ✍️✍️
अतिशय सुंदर चारोळ्या👌👌👌👌👌👌
ReplyDeleteKhupch sundhar apratim rachna di khup khup chan👌👌👌👌👌👌👌👌 ✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻🌟🌟🌟🌟🌟🌟💐💐💐💐💐👌🍫🍫🍫🍫🍫🍫
ReplyDelete