तो रागारागातच दार तीच्या तोंडावर मारुन बाहेर निघून गेला. तीने कसेतरी स्वतःला सावरले. डोळे पुसत ती किचनकडे वळली. उगाचच कामात गुंतवून घेण्याचा निष्फळ प्रयत्न करत होती. लहान मोठे वाद आणि मतभेद हे संसारात होतात. त्यांच्यातही ते व्हायचे, पण आज बोलतांना त्याने तीच्या मनाचा विचार कुठे होता केला.
भाऊ नसल्यामुळे वय परतावे आई बाबांची होणारी हेळसांड पाहीली नाही गेली. आणि म्हणून त्यांना आपल्या कडे आणायचा प्रस्ताव वजा विनंती केली. पण तो म्हटला हे "हे घर माझ आणि निर्णय मी घेईल. "त्याच माझ घर म्हणणं खोलवर टोचून गेलं.
कोण होती ती, कुणी आणलं इथे, दिवसरात्र संसाराच्या खस्ता का?? सल होण्यासाठी.... अस्तित्व विरलय ज्याच्यात त्याने असं बोलणं....
हे शल्य आजन्म राहील,सल बनून मनात..... हो शल्य आपल्या माणसाने दिलेली कडवट टुचणारी भेट.......
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही.... ✍️✍️
Wah di khupch sundhar alak katha khup chan 👌👌👌👌👌✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻🌟🌟🌟🌟🌟🌟💐💐💐💐💐
ReplyDelete