शब्दात कसं ना बांधाव.....
माईंंच मायाळू रूप......
शब्द ही होते नतमस्तक ......
म्हणे कठीण आम्हा खुप .....
परीस्थितीला दोष देऊन ......
लढणं सहज गं टाळलं जातं.....
जीवनी माई तुझी पहाता....
जगण्याचा अर्थ लागून जातो....
नभातील तारा की.......
काट्यावरील फुल म्हणू......
आई तु अनाथांची .......
आभाळमाया कशी गणू.....
जात, शिक्षण, संस्कार...
सारं खोटं वाटतं......
परीस्थिती खरा गुरु.....
तुला जाणता वाटतं.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही.... ✍️✍️
अप्रतिम रचना👌👌👌👌👌👌
ReplyDelete👌💐
DeleteKhupch sundhar apratim rachna di khup khup chan👌👌👌👌👌👌👌👌 ✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻🌟🌟🌟🌟🌟🌟💐💐💐💐💐👌🍫🍫🍫🍫🍫🍫
ReplyDelete