31 January 2022

मुल जन्माला येता, स्त्री आई म्हणून जन्म घेते....

मूल जन्माला येता.....
स्त्री आईचा जन्म घेते....
क्षणाची पत्नी अशी.....
अनंतकाळाची माता होते.....

लेकराच्या नावाबरोबर.....
नाव बापाच जोडल जातं....
हरून सगळ जींकता येतं....
कस गं तुलाच जमून जातं......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁




मूल ते जन्माला येता.....
स्त्री आईचा जन्म घेते.....
स्त्रीला खर्या अर्थाने स्त्रीत्व मीळते.....
जेव्हा ती आई होते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मूल ते जन्माला येता......
स्त्री  आईचा जन्म घेते.....
त्यागाच प्रतीरूप आई......
जगण्यातून दाखवून देते.....

ओल्या अंथरूणावर त्याच्या.....
रात्र ती  काढते......
त्याला जपता जपता....
कितेक रात्री जागते.....

किती गणावे त्याग बरे....
तारे कमी भासतील....
या ऋणातुन मुक्तीसाठी.....
किती जन्म लेकराला घ्यावे ना लागतील...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मूल ते जन्माला येता.....
स्त्री ही आई होते.....
आईच काळीजच.....
अर्थ काळजीला देते.....

निरागस त्या बाळाला.....
नको व्हावा त्रास.....
किती ती सोडते खाणे.....
आवडीचे पदार्थ नी घास....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मूल जन्माला येता.....
स्त्रीची आई झाली.....
अस्तीत्व नात्यात विरघळण्याची....
सुरवात ही गोड झाली....

अबोल निरागस जीव.....
स्पर्शाने तीला जाणतो.....
त्याच्या रडण्याचा अर्थ....
आई म्हणून तीलाच लागतो....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मूल जन्माला येता.....
स्त्रीचा जन्म आई म्हणून होतो....
वेदना आणी आनंदाचा संगम.....
मातृत्वाच्या या गोड क्षणात होतो....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

जेव्हा मूल जन्माला येते.....
मूलगा की मूलगी सारे पुसतात.....
सुखरूप  बाळाला पहाता.....
आनंद अश्रृ तीचे ओघळतात....

आई म्हणून झालेला जन्म.....
दुनियादारीला दिसणारा होता....
तीचा आणी बाळाचा ऋणानुबंध....
गर्भातच जुळला होता....

जेव्हा एक मूल जन्माला येते.....
तेव्हा स्त्री आई म्हणून जन्म घेते....
लेक,पत्नी,सून या भुमीकेतून....
ती आजन्मासाठी आई होते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

गर्भातल्या बाळाशी....
गूज तीचे क्षणक्षण घडते.....
गर्भसंस्काराचे महत्व जाणता....
ती त्याला तीथेही जपते.....

अशी संस्कार देण्याची कर्तव्य.....
ती आपली निभावत असते....
जेव्हा मूल जन्माला येते....
तेव्हा स्त्री आई म्हणून जन्म घेते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

निसर्गानेही मातृत्वासाठी.....
स्त्रीला निवडले होते.....
ती नाही साधारण.....
हे सांगणे कुणा कळले होते.....

जेव्हा एक मूल जन्माला येते.....
स्त्रीचा पुनःजन्म होतो.....
प्रसवपिडेच्या यातनेतूनच.....
स्त्रीचा आई म्हणून जन्म होतो.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

गर्भात भृण येताच......
आई होण्याचे कर्म ती जाणली होती.....
बाळाला त्रास नको म्हणून ती.....
चालणेही आपले बदलली होती....

गर्भातच नाळ तीची अशी.....
बाळाशी जुळली होती.....
जेव्हा मूल जन्माला आल.....
तेव्हा स्त्री आई म्हणून जन्मली होती....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

प्रत्येक स्त्रीत असते.....
आई ती दडलेली.....
बाळाच्या जन्मानंतर.....
असते आई म्हणून रूळलेली....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                       शाही......✍️✍️


3 comments:

  1. खुपच सुंदर रचना 👌👌👌

    ReplyDelete
  2. अप्रतिम सुंदर रचना ताई

    ReplyDelete
  3. अप्रतिम शब्द रचना..👍✍️👌🌹🍫

    ReplyDelete

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...