तू रे छान कवी....
मी तुझी रे कवीता.....
जाणवते शब्दा शब्दात....
तूझी प्रेम सरीता...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
बुबुळाची काळजी.....
पापणी घेतेना जशी.....
मी ही घेईन काळजी.....
संगनी होऊन तुझी अशी...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
मी होते रे शून्य......
जमा तूझ्यात रे झाले.....
जीवनाच्या गणीताचे....
उत्तर सहज म आले.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
मी तुझी रोहीणी....
तु माझा रे शशी.....
तुझ्या निस्वार्थ प्रेमाला....
मी वीसरेन रे कशी....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
नयन आणी ज्योती......
संगतीला आहे जसे.....
वचन चल देऊना......
तु आणी मी राहू असे....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
तू आणी मी.....
नेहमी रे असे असू.....
डोळ्यात लपलेले....
जसे ना आसू.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
मी अवखळ पतंग.....
तू माझा मांजा....
नेहमी सावरशील मला...
विश्वास राहील साजा...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शींपला होऊन.....
जपेन गं तूला.....
मोती होऊन तू.....
राहशील ना संगतीला.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
तू हो पूढे....
मी आहे मागे बघ.....
लढायच तुला एकलीला संकटांशी....
अशा बोलणार्यांपासून जप....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
तू कप आणी.....
मी रे तुझी बशी.....
तूझ्या ओतलेल्या रागाला....
मी सामावून घेईल अशी....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
चल ना सुई दोरा होऊ....
तू आणी मी.....
उसवू देणार नाही परीवार.....
देऊ हीच रे सगळ्यांना हमी....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही....✍️✍️
No comments:
Post a Comment
Welcome to Shaheen plz. Comments