काळजाला गारवा....
मिठीत तुझ्या रेअसतो....
कधी तुझ्या डोळ्यातही....
हसतांना तो दिसतो....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
मिठीत तू घेता.....
स्पर्श सारे रे हसले होते.....
व्यक्त होता आज.....
शब्द नी अश्रृ थकले होते....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
आठवणींची मिठी....
किती ना गोड असते.....
दुरावलेल्या नात्यांचीही.....
भेटीची ओढ त्यात असते.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
वादळे मनातील.....
अशीही सावरली जातात.....
भेटण अशक्य असता.....
शब्दमिठीनेही आवरली जातात....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
चुकीची शीक्षा म्हणून.....
मिठीत त्याला ग घेण असतं....
या गोड शीक्षेसाठी म.....
उगाच पून्हा पून्हा चुकणं असतं.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
संस्मरणीय आजही......
नजरमिठी ती पहीली.....
हरवली तेव्हाच तूझ्यात....
कुठे माझी मी राहीली....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
सखीने दिलेली मिठी.....
गोड क्षणांनी भरलेली असते.....
बालपणीचे छान क्षण.....
डोळ्यातून गाळलेली असते....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
अब्बांची मिठी खरच.....
जादूची झप्पी असायची....
चिंता आणी संकट....
क्षणात त्या मिठीत विरायची.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
आई तुझ्या प्रेमळ मिठीला......
नाही ग जगात तोड.....
माझ्या सुख दुःखांना नेहमी......
राहते तूझ्या मिठीची ओढ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
घेऊन मला मिठीत.....
शांत करना मनाला.....
भेटण आता कठिण.....
समजाऊन सांग त्याला......
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
वीजांचा तो कडकडाट....
आणी घाबरून मिठीत तूझ शीरण....
संस्मरणीय आहे आज ही ती मिठी....
आठवणीत त्या आजही हरणं....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
किती ग बडबड तूझी....
शांत ही राहत जा.....
मिठीत येऊन कधी....
स्पर्शालाही बोलू देत जा....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
प्रत्येकच मिठी तूझी....
संस्मरणीय असते.....
मनातील वादळ मिठीत तूझ्या....
क्षणात वीसरून बसते....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
त्याची ती मिठी.....
विसरायला लावते सगळ....
सोबती आहे ना मी....
स्पर्शातून सांगणच वेगळ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
मीठी ती .....
खुप काही ग देऊन गेली......
मनात असलेल्या प्रश्नांना....
अबोल उत्तर ठेऊन गेली...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
तुझ्या हदयाची स्पंदन....
नाव माझं घेतात.....
मिठीत तूझ्या शीरता....
आजही ग्वाही देतात....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
No comments:
Post a Comment
Welcome to Shaheen plz. Comments