सुंदर स्वप्न
शाप अपूर्णत्वाचा
मोह मनाचा
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
माझं एक स्वप्न.....
डोळ्यात त्याच्या लपलेल....
ऋणानुबंध अस गोड......
मनाशी मनाचं जपलेल.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
माझ्या शब्दफुलांना.....
मनामनात ग जपल जावं....
या सुंदर स्वप्नाने.....
डोळ्यांच्या पालखीत रोज गं याव.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
न भेटणार्यांबरोबर ही.....
स्वप्नात मैफील ना रंगते....
स्वप्नांची ही जादूच ग.....
मोह स्वप्नांचा पाडते....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
एक स्वप्न आई.....
लेकरांच्या सुखाच रोज बघते....
प्रार्थनेतही आपल्या ती....
शंभरदा हेच मागते....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
एक सुंदर स्वप्न....
जातीभेद,लींगभेद संपून रे जावा....
माणसाने माणसापरी...
माणूसकीला जपून घ्यावा...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
समजून घेतली जाईल ती.....
स्वप्न रोजच पडलेलं....
उद्या होईल पुर्ण म्हणता....
रोजच तीला छळलेलं.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
खुप आहेत रे स्वप्न.....
कस धाऊ स्वप्नांच्या मागे....
चंद्रमौली झोपडी माझी.....
राजमहालाचे स्वप्न न भागे....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
हाताच्या ओंजळीत....
स्वप्न किती रे रेखाटलेली....
मुठ घट्ट आवळून ही....
होती रे खूप सांडलेली....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
आपलं ते सुंदर घर....
नाही रे नुसत्या भिंती...
जगण्यासाठी वीणलेल सुंदर स्वप्न...
रहाव सलामत प्रार्थना रे मनामंधी...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
एक सुंदर स्वप्न....
असही जपल बर....
अबोल आपल प्रेम...
स्वप्नात तरी खुलाव खर....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही.....✍️✍️
अप्रतिम चारोळ्या खुपच सुंदर 👌👌👌💐💐💐
ReplyDelete