07 February 2022

चारोळी संग्रह.... 7/2/2022

बालपणीच्या आठवणीत आठवता का....
धपाटे शाळेत न जाण्यासाठी पडलेले....
आज त्याच शाळेच्या आठवणीत....
अश्रृ किती ना गळलेले....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

बालपणीच्या आठवणीत.....
आई ती स्वस्थ नी निरोगी दिसली.....
वयोपरत्वे आलेले परावलंबत्व पहात....
मनात होती फास रेफसली....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

बालपणीच्या आठवणीत.....
एक गोष्ट छान होती.....
निरागस त्या मनाला.....
दुःखाची कुठे जाण होती....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

बालपणीच्या आठवणीत....
जपलाय ना रे तो पाऊस....
ती होड्यांची गंम्मत....
आणी भीजण्याची ती  हौस....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

बालपणीच्या आठवणीत......
सखींसोबतचे खोडकर क्षण.....
त्या गमती जमती आठवता....
हुरहुरते भेटीस  गं मन.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

बालपणीच्या त्या आठवणी......
गुपीत गोड सांगून गेल्या.....
आयुष्याच्या पुस्तकाचे बालपणच.....
आनंदाचे पान  रे म्हणून गेल्या.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

किती गोड होतं ते.....
कट्टी सो च जगण......
दोष गूण सर्व विसरून....
निरागसपणे वागण.. ...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आठवणी त्या बालपणीच्या....
हव्या हव्याश्या वाटतात.....
कितीदा ही आठवा....
त्या नव्या नव्याश्या वाटतात....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

बालपणीचा क्षण क्षण....
आहे रे गोड आठवण.....
मनात जपलेली आजही....
सगळी ती साठवण....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

बालपणीच्या आठवणीत....
हरवल निरागसपणाच परीस....
उगाच पडलो ना.....
मोठं व्हायच्या भरीस....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

बालपणच आहे....
गोड ती आठवण.....
मनात जपलेली.....
आजन्माची साठवण....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

बालपणीच्या आठवणी.....
किती ना रे गोड.....
सरता सरत नाही.....
कधी त्यांची ओढ.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                  शाही.....✍️✍️


2 comments:

  1. खूपच छान बालपण 👌
    🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
    आबा
    🙏

    ReplyDelete
  2. Khup khup chan kavita lihili ahe mast ekch number

    ReplyDelete

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...