सबमिशन पूर्ण करतांना...
एकमेकांना मदतीचा हात.....
प्रश्न उठता जीवनात.....
हवीशी वाटते आजही ती साथ.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
काँलेजला शेवटच्या बेंचवर बसून....
खुपदा ग ते डबे वाटुन खाणे....
बालपणीच्या भातूकलीचे....
होते पून्हा असे आठवून घेणे.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
गृपस्टडी करायची.....
वेगळीच ना होती गंम्मत....
प्रश्न सहज सुटायचे....
मैत्रीची आठवते ती रंगत...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
ययचो ग काँलेजला....
फक्त तूला पाहण्यासाठी....
दुनियादारीची कर्तव्य.....
तेव्हाही रहायची पाठी.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
आठवतात काँलेजचे.....
ते गुलाबी क्षण.....
मन तूझ्यात गुंतल्यावर....
अभ्यासात कुठे रमेना मन....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
काँलेजने दिला हक्क.....
आवडीचा विषय निवडण्याचा....
जाणीव झाली उशीराने.....
तो गुरुमंत्र होता जगण्याचा.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
काँलेजच्या दिवसात....
स्वप्न होते गगनाला गवसण्याचे....
पाय नाही सोडले बंधनांनी....
माझे आणी माझ्या मनाचे....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
काँलेजची ती मैत्री.....
आणी ते प्रेम अव्यक्त.....
किती ना असता खास.....
जाणतो जपणाराच फक्त....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
काँलेजच्या जीवनातले....
आठवतात ते मस्त क्षण.....
आत येऊ का सर विचारायचं एकाने....
आत घुसायचे दहा बारा जणं.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
आठवत ट्रेडिशनल डे ला....
नऊवारी नेसून ते जाणं....
संस्कृती जपल्याच्या....
वेगळाच भाव ते जपणं....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही.....✍️✍️
खूपच सुंदर अप्रतिम लिहले आहे college चे दिवस आठवले
ReplyDeleteReally beautiful poem
ReplyDelete