18 June 2022

अभिनय....चारोळी संग्रह

बोलायच नाही तुझ्याशी जा!......
म्हणता हात तूझ ते गं धरून घेण......
तुझ्या या निरागस अभिनयावर.....
कस होईल बर सांगना ,तूला ते सोडून जाण...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

दुर तू जातोय म्हणता.....
रडायच ही मी नसत.....
कसं ना तूझ हे माझ्या....
अभिनयाची परीक्षा घेण असत...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

वेडी तूझ्या रूसण्याचा अभिनय....
कळतो मला बर.....
वेळ माझी हवी तुला.....
सांगावा गोड असतो गं त्यात खर....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तीच्या अस्तित्वालाच.....
अभिनयात गणल गेलं.....
सरणावर गेल्यावर मात्र......
कौतुकात छान विणल गेल....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

खोटे खोटे हसता.....
तो विदूषकही वेदनांनी रे रडलेला....
अभिनय छान म्हणता.....
टाळ्यांचा पाऊस  होता गर्दीत रे पडलेला...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अव्यक्त राहुनही.....
मानसिकता ढासाळू द्यायची नसती....
खरच पुरुषाच्या अभिनयापुढे....
शब्द माझे नतमस्तक  असती....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

वेदना आपल्या लपवून.....
सगळ्यांना तो जपत असतो.....
बापाचा अभिनय हा......
बाप झाल्याशिवाय उमजत नसतो....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मरण अटळ असताही......
अमरत्वाचा माणूस अभिनय करतो.....
यक्षप्रश्न हा माणसाला पहाता.....
युधीष्ठीरांनाही म्हणे  पडतो.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

चिंब भीजूनही पावसात.....
अश्रू त्याला  गं कळतात.....
सगळे बेगडी अभीनय माझे....
त्या वेड्यापुढे  गं हरतात.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

चोरुन तू बघते मलाच......
मी बघता का गं नजर वळवते....
निरागस  अभिनय तुझा  हा वेडू.....
भाव  प्रेमाचे तूझे सहज गं कळवते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                           शाही...✍️✍️


No comments:

Post a Comment

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...