सोनू किचनमध्ये चाललेली दोघींची चुळबूळ पहात होता.काहीतरी हरवलय त्याच्या ही लक्षात आलेल.कार्टून पहाण सोडून तो कीचन कडे येत येत च बोलला,आई आणी मावशी,'काय ग शोधताय तूम्ही,बघतोय केव्हांचा .मी काही मदत करू का?सांगा न मला??"आई त्राग्यातच म्हटली,"जा तू कार्टून बघ तूला नाही सापडणार जा"!!पण त्याने हट्टच धरला मी मदत करतो म्हणून...
आईने सांगीतले त्याला, 'अरे राजा,पावशेरा शोधतोय,उदया पुरणपोळी करायची ना!!,त्यासाठी.मावशीला त्यावरून प्रमाण मोजण्यासाठी म्हणून."त्याने पुन्हा प्रश्न केला,पावशेरा म्हणजे काय आणी कस गं असत ते??ती वैतागूनच म्हटली' जा ना राजा तू लहान रे तूला नाही उमजणार."..
पण सोनू तर सोनूच त्याचा हट्ट संपेना.शेवटी आईने सांगीतलेच,"अरे ते काळ असत लोखंडाच आणी लहान असत कुठ पाहील का? आठवल तर सांग,मावशी कुठे ठेवल तेच वीसरली."..
त्या दोघ कीचनमध्ये शोधतच होत्या तीतक्यात सोनूचा आवाज आला,आई !!सापडला ग पावशेरा मला....आणी ते इतक जड कस तरी उचलून तोलूनआईजवळ आणलं...ते पहाताच दोघ बहीणींची हसून पुरेवाट झाली.आईने त्याला हसतच मीठीत घेतल आणी म्हटली' हे नाही रे राजा हा खलबत्ता आहे".तो निरागसपणे बोलून गेला, पण तू तर म्हटलेलीना आई लोखंडाच काळ असत,मोजण्यासाठी वापरतात....
सोनूचा निरागसपणा आणी घडलेली ही गंम्मत आज उगाच आठवली.नामकरण खरच गरजेच .पण लक्षात आल ते शेक्यपीयर यांच ते वाक्य,what's in a name?? खरच नावावरून आपण अंदाज बांधू नये.शांती ही अशांत करत अहेली आणी अबोली बडबडही असेल.,बारकू हा जाड ही असेल.
एका नावाची कीती लोक असतात,बाह्यरुपातही साम्यता असू शकते जशी पावशेरा आणी खलबत्यात होती.पण कर्म प्रत्येकाची वेगळी आणी तीच खरी नावाला अर्थ देतात.म्हणून नामकरण होतच असत मागे पुढे प्रेमाने किंवा व्देषाने . त्याची आपली वेगळीच गंम्मत.पणखरच इतक्या लहान वाक्यात किती गहन अर्थ दडलाय....
नामकरणाची गंम्मत असली जरी पण कर्मात
दडलीय त्याच्या अर्थाची जादू खरी.... हो ना!!!...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही...✍️✍️
No comments:
Post a Comment
Welcome to Shaheen plz. Comments