25 June 2022

दोन क्षण...

ऐकना...!!!
नाही केली रे अपेक्षा.....
फुल तू द्यावे अशी ती कधी.....
फुल आणी काटे असतील.....
जीवनाचा भाग म्हणता अधी मधी.....
पण,एक सांगू....
येतजाना घरी कधी कधी लवकर.....
वाट बघता तुझी दमते रे घरभर.....
नको आणूस फुल भेट म्हणता द्यायला....
पण,ओढ आणी आनंद ओसंडूने....
भेटण्यासाठी फुल असेल माझ तेच....
नको हे कधी तु  विसरायला.....
आहेत काही काटे मनात बोचलेले....
सांगायच पण ओठातच रोखलेले....
तूझी दगदग पहाता नाही वाटत सांगावेसे....
पण,वाटत म्हणाव कधी तु.....
मी आहे ना सोबत का गं काळजी करते....
जादू तूझ्या शब्दांची आजही मनावर चालते....
हे काटे ही होतील बोथट शरीराने नाही....
मनानेही असशील का कधी तु संगत....
घेशील कधीओंजळीत भरलेली प्रीतीची फूले....
देशील तूझ्या मनीचे ते काटे न कळलेले....
काही नाही म्हणता सहज तू दडलेले.....
देवाण घेवाण फुल आणी काट्यांची.....
करत जाऊ ना कधी कधी....
किती धावपळ ही जगण्याची....
दोन क्षण थांबत जाऊना रे.....
कधी एकमेकांमधी.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                            शाही...✍️✍️


No comments:

Post a Comment

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...