21 June 2022

चारोळी संग्रह....

बंद दारामागे काय?.....
कुतूहलाने ठोठावता  गं ते दार.....
गरज कळता फिरून नाही  येणार....
सांगू नकोअंतरमनातील वादळ  सगळ्यांना बर सार...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

स्त्रीच ती समजून घेण तीला....
उमजून नाही घ्यायच कुणाला....
मोनालीसाच्या पेंटींगसारख....
कुतूहल फक्त क्षणाला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मौनाच्या तलावात....
प्रश्नाचे खडे किती बर रे  मारावे.....
उठणार्या तरंगांचे  सांग ना.....
कुतूहल कधी का सरावे....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तुझ्या बदलण्याच कुतूहल.....
क्षणात रे तेव्हा सरल.....
अंधार पडता सावलीनेही.....
होत न जेव्हा एकट सोडल....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कुतूहल हे जणू.....
अवखड रे घोडा......
संयमाची लगाम लावता.....
थांबत नाही तो थोडा.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

बघ्याची भुमीका निभावतोय.....
आज तो समाजात बर.....
कुतुहलाने प्रश्न पडणार्या बालमनाला.....
नेहमी गप्प केल्याची ही का रे शिक्षा खर....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नाविन्याच कुतूहल......
निसर्गाची गोड रे खेळी.....
जगण्याची वाढावी उत्सुकता.....
सांगावा हा त्यात रे प्रत्येक वेळी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कुतुहल सरता......
प्रेम ही का सरत.....
प्रेम की वासना अंतर....
यावरून का ठरत.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कुतूहल वाटत......
गळणार्या त्या ढगांच.....
का बर रडतात.....
दूःख कळेना कधी त्यांच....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

प्रत्येक गोष्टीला जाणण्याच....
कुतूहल तीला भारी.....
काही गोष्टीची अनुत्तरीतच.....
कस सांगू गंम्मत असते सारी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नभातील शशीला पाहुन....
कुतुहल वाटत....
हा ही लीहण्यासाठी का....
रात्र रात्र जागतो....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

लहान मुलांसारख....
असाव  वेड मन.....
कुतुहल जीवनाच.....
रहाव क्षण क्षण.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                             शाही...✍️✍️


1 comment:

  1. अप्रतिम....👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻💖💖💖💖💖🍫🍫🍫🍫🍫🌹🌹🌹🌹🌹

    ReplyDelete

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...