छंद जगण्याचा उमजतो.....
वाचनाच्या छंदातून ही बर......
दुनियादारीचा व्यवहार कळतो.....
शिक्षण आणी वाचनातुन खर....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
छंद जगण्याचा खरा....
स्वच्छंदी रे त्या पक्षांना कळतो.....
ऊद्यासाठी नसते तडजोड.....
मोह त्यांना नभाचा कुठे ना पडतो....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
माणुसकीच्या वेडालाही......
छंद जगण्याचा रे करता यावा......
ताटातले देऊन आपल्या.....
दुसर्यालाही जगवता यावा.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
तूझ्या आठवणींचे दव.....
मनाच्या पानावर सांडलेले......
आजही जगण्याचा छंद तेच.....
तु कधी न हे जाणलेले.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
छंद जगण्याचा तीचा....
नका हिरावू बर....
लोक काय म्हणतील म्हणता.....
घाबरवू नका हो तीला खर.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
छंद शिकवतात......
जगण्यावर प्रेम करायला.....
छंदातूनही कळतो स्वभाव......
कुणा सहज समजून घ्यायला.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
कविता लिहण्याचा छंद.....
जगणच स्वच्छंद करून गेला.....
जणू पुष्पात सुगंध....
अर्थ असाना येऊन गेला.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
आयुष्यातीत चुकीच्या व्यक्तींनी.....
योग्य धडा रे शिकवीला होता.....
जगण्याची कला कळता....
छंद जगण्याचा झाला होता....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
इवलीशी मुंगी प्रयत्नांनी......
अडथळ्यांवर मात करून गेली.....
जीद्द हा ही जगण्याचा छंद.....
हळूच रे शिकवून गेली.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
पाकळ्यांच् गळण म्हणजे.....
फुलाच मरण ना असत.....
मरतांनाही सुगंध देण.....
खर यातच जगण्याचा छंद असतो....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
तुच राजा बर.....
छंद माझ्यारे जगण्याचा.....
बदलला दृष्टीकोन.....
सुख दुःखरे बघण्याचा....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
छंद जगण्याचा.....
सुर्य चंद्र जाणतात....
अस्त असो की ग्रहण....
अविरत ते चालतात....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
छंद जगण्याचा.....
झरा तो शिकवून गेला....
किती कपार्यातूनही.....
खळखळत हसून आला.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
काट्यावर राहुनही.....
हसतो रे तो छान......
गुलाबाचा छंद जगण्याचा.....
हरपतो खर रे भान....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही....✍️✍️
No comments:
Post a Comment
Welcome to Shaheen plz. Comments