20 June 2022

जादूटोणा...चारोळी संग्रह

जादूटोणा नाही गं वेडू......
Telepathy असते म्हणे......
आठवण काढता मँसेज त्याचा येणं ......
हे खर प्रेमातच घडते म्हणे.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

साक्षरतेच प्रमाण वाढताही.....
जादूटोणा विधेयक आणावा लागला.....
अ.नि.स.च्या कामात उचलू खारीचा वाटा.....
अपरीहार्य तो सांगावा लागला.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

श्रध्दा आणी कर्मांवर.....
असूदे अढळ विश्वास बर.....
मांत्रीकाच्या मंत्रात नाही ताकत.....
थांबवेल जी प्रगती नी श्वास खर....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

होत रे एक निरागस वय.....


जादूवरही विश्वास बसायचा.....
दुनियादारीच्या शहाणपणात तर....
सत्यावरही संशयच असायचा....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नभातील शशीवरही.....
जादू अशीना चढली.....
रोज येऊन खीडकीत म्हणतोकी.....
मला आहे गं तु आवडली....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

यावी रे मला.....
जादू अशी करता.....
दूःख तुझे सारे घेऊन......
आनंदाश्रू डोळ्यात तुझ्या भरता...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁


कायदे आणी विधेयक आणून.....

नाही बदलत मनोवृत्ती बर.....

शिक्षण आणी प्रबोधनच....

अंधश्रध्देवर उपाय खर....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

जादूटोणा केला की......
काही खाऊ घातले  बर......
तुझ्या आठवणीत जग वीसरलो.....
कस हे घडत सांग ना खर.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

भीकारीच वाटत होता.....
मांत्रीक ना तो तसा.....
बळी देऊन श्रीमंत होण्याचा.....
जमला नाही स्वतःसाठीच ऊपाय रे कसा....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

लींबु मीरची आहेत......
पदार्थ ते खाण्याचे.......
कसे व्हावे ते कारण.....
जीव घेण्या देण्याचे....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                         शाही....✍️✍️


No comments:

Post a Comment

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...