18 July 2022

पिंजरा......चारोळी

श्वासाचा पिंजराही....
सोडेन साथ कधी......
व्हाव विसरण तुला.....
सोप रे त्या आधी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

श्वासाचा पिंजराही....
सोडेन साथ कधी......
व्हाव विसरण तुला.....
सोप रे त्या आधी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

पिंजरा नाही गं वेडू.....
आभाळ तुझ व्हावचय......
स्वच्छंदी आभाळात.....
विहरता तूला पहायचय....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

पिंजर्यातल्या पक्षीला.....
मुक्त ती करून देते.....
न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा....
आजही तीला आठवून जाते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आहे म्हणे छंद त्याला.....
पिंजर्यात पक्षी पाळण्याचा.....
स्वप्न पहातो स्वतःसाठी.....
आभाळ ते गाठण्याचा....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

पिंजर्यातला पक्षी......
जणु स्त्रीच जग.....
आपलेच पंख कतरून.....
जमते तीलाच हसणे बघ.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आवडल असत रे......
प्रेमाच्या पिंजर्यात तुझ्याच रहायला.....
तूझ ते गृहीत धरण.....
लागल आता रे छळायला.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अत्यावश्यक असूनही.....
कोरंनटाईन होण होत  ना वाईट कीती.....
आजही तो पिंजरा आठवता.....
मनात दाटते अनामिक भिती.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

रुढी परंपरांचा तो पिंजरा.....
कर्तव्य तीच म्हटल जातं....
किती सहज तीला.....
बंधनात ते डांबल जातं.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                            शाही....✍️✍️

                 


No comments:

Post a Comment

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...