शब्दात जसा....
अर्थ असतो ना दडलेला.....
अंतरही आपल्यातला....
कळूनही तसा न कळलेला.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
अश्रु आहेना जसा....
डोळ्यात रे लपून....
अंतर आपल्यातलं...
ठेऊ अस हं जपून ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
तु आणि मी जणू.....
नदीचे दोन किनारे ना......
आपल्यातले अंतर आता....
कधीच न संपणारे ना.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
तूझ्या माझ्यातील अंतराची.....
काय सांगू बर खेळी.....
जणू मृग आहे रे.....
कस्तुरीसाठीच वेडी....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
मनाच अंतर.....
आपल्यात नसाव बर.....
मी सोबत नसताही .....
तु माझाच असावं खर.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
चातकासारख एकनिष्ट.....
खर रे होता यावं.....
तुझ्या माझ्यातील अंतराला.....
गमवण्याच्या भितीच नाव का द्याव.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
दुराव्यातही नाही संपत....
प्रेम तेच खरं.....
तुझ्या -माझ्यात असूदे...
कितीही अंतर बरं....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
पाण्याशिवाय मासा.....
जगेल का सांग बर......
तुझ्या माझ्यातील अंतराच.....
हेच असेल खर.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
मेहंदीच्या पानात.....
लाल रंग लपलेला......
अंतर तुझ्या माझ्यात....
इतकाच मी जपलेला....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
अंतर असावं....
तुझ्या माझ्यात रे थोड.....
भेटण्याची राहील ना....
मनात रे ओढ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
अंतर तूझ्या माझ्यात....
नाही रे खास....
आपण दोघ माणूस....
तू विसरतो हाच फास....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
अंतर तुझ्या माझ्यात....
कस रे सांगावं.....
फुलात सुगंध इतका....
तु माझ्यात रेअसावं....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही....✍️✍️
No comments:
Post a Comment
Welcome to Shaheen plz. Comments