छंदच असतो जो....
स्वतःशी भेट घडवून जातो....
स्वःताला सिध्द करण्याची संधीही....
खूपदा ना देऊन जातो...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
सगळ्यांना जोडून ठेवण्याचा.....
छंद तीचा घायाळ तीला करुन गेला....
तीच्या मनाचा आक्रंद.....
कुठे कुणा तो ऐकू आला.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
पुष्पात सुगंध.....
जसा ना दडलेला.....
तसाच तूझा छंद.....
मला रे जडलेला.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
वेडू बडबड करण्याचा छंद.....
तूझा मला रे जडला.....
एकांतात स्वतःशीच संवाद......
असा खुपदा मग घडला....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
चातकाला जसा.....
पाऊसाचा वेध लागतो....
तुझा छंद असाच.....
वेड्या मनात जागतो....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
छंद तूझा असा......
लागला वेड्या मनाला.....
ह्दयाची स्पंदन घेतात.....
नाव तुझच क्षणा क्षणाला.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
श्रावणात सृष्टिलाही......
छंद जणु लागतो......
पारिजातकाचा तो सडा......
मन मोहून टाकतो.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
लाटांशी बोलण्याचा.....
छंद लागला रे तुझा.....
दुर देशावरून जणू.....
सांगावा देतात त्या तूझा ......
.
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
आयुष्यावर प्रेम करण्याचा....
छंद लागला रे तूझा.....
चंद्रमौली झोपडीतही....
समाधानी जगण्याचा....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही...✍️✍️
No comments:
Post a Comment
Welcome to Shaheen plz. Comments