27 July 2022

विषय-गैरसमज....चारोळी संग्रह

गैरसमजात का गं....
टाकून अशी जाते......
जातांना सांगना  वेडू....
का गं तू हसून जाते....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

फक्त मीच त्याच्या मनात.....
उध्वस्त करून गेला गं....
हाच गैरसमज....
किती जीवनात....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कधी कधी वाटतं.....
गैरसमजांनी ही सोडून ते जावं....
नात्यातील वादांना टाळून.....
मनांनी नातं पक्क व्हावं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

समजून घेण्याची.......    

घे तु हमी......

गैरसमज कसे......

होतील बघ निकामी.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

एकमेकांविषयी बोलण्यापेक्षा.....
एकमेकांशि बोलायला रे हव....
गैरसमजांना असही ना....
दुर सारायला हव....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

चुक नसताही उगाचं....
अपराधी वाटून गेले.....
तुझे गैरसमज जेव्हा.....
वेड्या मनी आठवून गेले....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

गृहीत धरण्याची.....
तुझी रे खेळी.....
गैरसमज वाढवते....
प्रत्येक  वेळी.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

गृहीत धरण्याची.....
तुझी रे खेळी.....
गैरसमज वाढवते....
प्रत्येक  वेळी.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

गैरसमज नात्यातील......
जणू  रे वाळवी......
वेळीच दुर कर....
अश्रू लागतील नाहीतर गाळावी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

गोड गैरसमज.....
मी ही रे केलेला.....
वाटतं उगाच तू....
फक्त माझाच रे झालेला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

गैरसमज होतो तीला.....
सगळ्यांना बघून मी म्हणे हसतो....
कसं सांगू  त्या वेडीला....
प्रत्येकीत चेहरा मला तीचाच दिसतो.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

माझ्या अबोल्याचे....
अर्थ कारे काढतोस....
गैरसमज करून का....
मलाही जाळतोस....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तु हसत.....
वळून पाहीले.....
आवडते तुला....
गैरसमज हे राहीले....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

संवाद नात्यातला....
जीथे संपतो.....
गैरसमज तीथे.....
मनसोक्त रमतो.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

गैरसमज इतका......
दोघात वाढला.....
न बोलताही त्याने......
अर्थ हवा तो काढला.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                          शाही....✍️✍️

लेखन असते हे......
कल्पनेचे तारे हो तोडून.....
गैरसमज करता वास्तवाशी....
अर्थ नका हो देउ जोडून....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

          


No comments:

Post a Comment

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...