नजरेच्या भाषेची.....
नाहीच उमजली तूला खेळी....
मीटलेल्या डोळ्यातही.....
कस सांगू तूच रे प्रत्येक वेळी....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
तूझ्या डोळ्यांची भाषा.....
खळखळणार्या झर्या साखरी.....
खुप आवडते मी तूला.....
सांगावा तूझा देतात सारखी....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
कधी कधी वेडू.....
रहात जा गं चुप.....
डोळ्यांनाही डोळ्यांशी.....
बोलायच असत खुप....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
डोळ्यांची भाषा...
त्याला नाही ग कळली.....
त्याला आपल समजून....
होती ती गळली.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
मनात होती एक....
गोड वेडी आशा.....
कधीतरी कळेल तूला.....
माझ्या डोळ्यांची रे भाषा....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
तूझी डोळ्यांची भाषा.....
डोळ्यांना रे कळली.....
क्षणात ह्दयाची....
स्पंदन ती जुळली.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
मनात काय तीच्या.....
डोळ्यातून कळत होत....
भरून आलेल्या आभाळागत....
मुकच ते गळत होत.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
डोळ्यांची भाषा.....
चरीत्र ही ग ठरवून जाते.....
चंचल की संस्कारी.....
लवणारी पापणी सांगून जाते....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
डोळे तुझे गं.....
किती ना बोलतात....
मनातील दुंःख सारी.....
पापणीआडची खोलतात....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
डोळ्यांची भाषा तूझी.....
कोड्यात रे टाकून गेली.....
खर का मी तुला....
सांग ना आवडून गेली....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
डोळ्यांची भाषा.....
तुझी आवडते रे मला.....
तू लपवलेल सार......
सांगून जाते ती मला....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही....✍️✍️
No comments:
Post a Comment
Welcome to Shaheen plz. Comments