03 July 2022

चारोळी संग्रह

सूर्यही करतो.....

अर्ध जगच प्रकाशमान बर....
अर्धजग अंधारात असत....
हा निसर्गनियम समज खर....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

रात अंधारेल.....
अटळ प्रवास बर.....
ज्ञानदीप  खरा सोबती....
जाण हे सत्य खर....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कधी हो तु काजवा.....
कधी होईन मी पणती.....
अंधार्राच्या जाळ्याची....
नकोच ती गणती....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अंधाराच्या जाळ्याची.....
नाहीरे कधी केली तमा.....
तूझ्य्या सोबतीत वेड्या.....
खात्री यशाची आहे रे जमा....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

जाळून जीव जेव्हा....
केली ना मशाल....
अंधाराच जाळही....
सरल मग विक्राळ...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

होतजा बर.....
सूर्य तु कुणाचा.....

अंधाराच जाळ......
दुर करत जा जीवनाचा.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आई बाबांना पाहीलय.....
दिवा होऊन जळतांना......
अंधाराच जाळ दुर सारून.....
लेकरांच भविष्य घडवतांना.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

उन्हात काचेचे तुकडे.....
चमकतात बर.....
हिरा खरा पारखला जातो.....
अंधाराच्या जाळ्यात  खर.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तारे सदैव.....
चमकतात बर.....
पण अंधाराच्या जाळ्यातच....
दिसते त्यांचे अस्तित्व खर....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

दिव्याच्या प्रकाशाला.....
लागत अंधाराच जाळ.....
उगवतो सूर्य.....
अंधार असूदे किती काळ....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आशेचा किरण  बघ....
कशी धिटुकली पणती  देऊन गेली ....
मिळमिळणत्या प्रकाशाने....
अंधःकारातुन मार्ग  उजळवुन  गेली....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

गैरसमजही पसरवतो....
नात्यात अंधाराच जाळ....
विश्वास हरवता....
दिसत सगळ काळ....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अंधाराच जाळ.....
मर्यादा ग त्याला.....
सूर्य उगवेल.....
कोण थांबवेल त्याला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अंधाराचे जाळे विचारांनाही.....
लागतात खुपदा.....
श्रध्दा आणि अंधश्रध्दा यात.....
अंतर मिटतो खुपदा....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                         शाही....✍️✍️


No comments:

Post a Comment

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...