08 July 2022

जोडीदाराची निवड......चारोळी

जोडीदार निवडतांना.....
खानदान त्याच पहावं......
संस्कार नि विश्वासाच गणीत.....
अवलंबून यावर गं रहावव.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

बाप,भाऊ,मीत्र,सखा......
या नात्यांची गं जोडीदार सावली असावा....
सुख दुःखाच्या वहीवाटेवर.....
साथ तो पावलो पावली  असावा.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

जोडीदार बोलका नसला तरी.....
माझी  बडबड गोडीने तो ऐकणारा गं असावा....
चारचौघात लव यू नाही म्हणला तरी.....
सगळ्यांसमोर अपमान करणारा गं नसावा....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

जोडीदारासोबत निर्माण झालेली......
कोडी सोबतीने सोडवता आली पाहीजे.....
खरच जोडीदारामध्ये  खरा मीत्र ही.....
बघता आला गं पाहीजे.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

साम्यतेची नको करू....
वेडी गं ओढ.....
विपरीत जोडीदाराची निवडही....
ठरते गं खुपदा गोड...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

जोडीदार शोधता जातो.....
आपण  आपल्या गरजा घेऊन.....
निवड करण्याची अपेक्षा कशी.....
जातोच जर  मागणारा होऊन....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

काही नसत योग्य अयोग्य.....
अवास्तव मानसीकता ती....
जोडीदाराची निवड करता.....
पहावी जुळवून घेण्याची मानसिकता ती....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

प्रामाणिक आणी निर्व्यसनी.....
असावा गं जोडीदार.....
संसार सुखाचा होण्यासाठी....
असते हे महत्वाचे फार.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

लग्न ही वैयक्तीक बाब......
निवड ही असावी तुझीच खरी.......
दुसर्यांच्या सल्यावर नको निर्णय......
चुक  ठरू शकते  ही मोठी बरी......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

दोष आणी गुण......
अपरीहार्य माणुस म्हणता......
हे जाणूनही जो सावरून घेतो.....
त्यालाच ना जोडीदार गणता.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आयुष्य नाही परीकथा......
लग्न म्हणजे गं जबाबदारी.....
जोडीदार निवडतांना समझ......
वास्तव नी कल्पनेतली ही दरी......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

जोडीदार निवडतांना......
पुरूषाची  पहावी म्हणे कर्तबगारी.....
रूपावर भाळू नका....
म्हणतात वडीलधारे सारी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

जोडीदार निवडण म्हणजे.....
नाही हं स्वप्नातल्या राजकुमाराला भेटण....
जात कुळ समाजावर होत......
व्यवहार लग्नाचा तो थाटण.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

माणूस म्हणता कुणीच.....
परीपुर्ण नसतं......
जोडीदार निवडतांना......
विचार नि स्वभावाला महत्व गं द्यायच असतं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आई बाबांची काळजी घेणारा.....
मुलगाच जोडीदार गं निवडावा....
नात्यांना जपण्याचा गुणच.....
संसार सुखाचा मांडून जावा....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

जोडीदार नियतीने.....
असतोच ठरवलेला.....
भेटीसाठी निमीत्तांचा.....
खेळ हा खेळवलेला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मनात जो असतो......
तोच नशिबात रे असावा.....
जोडीदाराच्या निवडीत....
भाग्य कधी नं रे रुसावा....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

काही क्षणात कसा ना....
जोडीदार तो निवडायचा.....
कुणाला समजून घ्यायला......
आयुष्यही कमी पडायचा....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

जोडीदाराची निवड.....
कुठे तीच्या संमतीने होते.....
व्यवहार सगळे जुळले तर....
तीचे सरळ लग्न होते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                                शाही....✍️✍️


No comments:

Post a Comment

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...