16 July 2022

का हिरावला हक्क तीचा???

आज हा विषय आला आणी वाटल गुफांव तीला शब्दांमध्ये.तसे शब्द माझे थीटेच तीच्या संघर्षापुढे...ही सत्य घटना माझ्या बालमैत्रीणीची....खुप गर्व आणी अभिमान उषा सखी तूझा गं....
              वयाच्या 14 व्या वर्षि घरची  मोठी नात म्हणून उषाला बोहल्यावर चढवल गेल.बाबांच वय झालेलं त्यांची इच्छा पुर्ण व्हावी म्हणून हा मोठ्यांचा हट्ट... .आजही आठवते शाळेतल्या गणवेशात भांग भरून मंगळसूत्र घालून येणारी ती निरागस उषा.        
             तारूण्याच्या उंबरठ्यावरच संसाराशी गट्टी जमवत दोन्ही घरांचा मान जपत ती संसारात रूळली.देवयानी आणी आकाश नक्षत्रावाणी दोन फुल नियतीने तीला मातृत्वरूपात दान दिली.
            पण नियतीच ती!! का रुसली,काय गून्हा झाला ही सल मनात देऊन उषाला वैधव्य देऊन नीघून गेली.पुन्हा कमी वयात आभाळ कोसळल तीच्यावर .खुप कमी वयातच नवीन संघर्ष आल पदरी.
.           समाज,नियती स्वतःशी लढा देत दोन्ही लेकरांना मोठी केली. संस्कार नी वीद्येच दान देऊन आपली कर्तव्य पुर्ण केलीत.लेकरांनीही आपल्या आईच्या कष्टांचा मान ठेवला.
          आज उषा ची लेक देवयानी ही बी.ई.इलेक्ट्राँनिक्स कम्यूनिकेशन यात पदवी घेऊन  परदेशी जाँबसाठी जाण्याची तयारी करतीय. आणी आकाश बीसी. एस. करून आपला स्वतःची वेगळी वाट निर्माण करतोय.
        हे सगळ लीहीण्या ईतक सहज नक्कीच नव्हत.खुप खस्ता,प्रश्न,वादळ आली ,पण उषा न डगमगता लढली.
         हे सगळ करणारी एक आई आपल्या मुलीच कन्यादान नाही करू शकली. का??तर वैधव्य असल्यामुळे.आजच देवयानीच्या लग्नाचा वाढदीवस आणी हा वीषय योगायोग.
         आणी मनातील ही सल कर्तव्य पूर्ण करूनही हक्क कन्यादानाचा का नाही तीला,उषाला!!!.....
              गर्व वाटतो उषा तूझा इतक्या संघर्षातून तू दोन्ही पाखरांना आभाळ दिल उडण्यासाठी....आणी माफ कर तूझा तो कन्यादानाचा हक्क मीळवून देण्यात आम्ही सगळ्या सखीच असमर्थ पडलो....🙏🙏

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                        शाही....✍️✍️


No comments:

Post a Comment

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...