11 August 2022

अनोखी प्रेम कहाणी

त्याग नि समर्पणाचे.....
बंध जीथे बांधले गेले......
अनोख्या प्रेम कहाणीतं.....
सगळे ते गणले गेले......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अनोखी लव स्टोरी होईल तेव्हा.....
जेव्हा परीभाषा प्रेमाची समजेलं.....
इथे तर सगळे वासनेचे पुजारी......
खर प्रेम कसं ते उमजेलं.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

त्याचा होता खेळ.......
ती प्रेमात पडली होती.......
कहाणी अनोखी अशी वाचता......
वेडी ती रडली होती......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

प्रेम ही कधी कधी.....  
असहाय करून रे जातं......
दिसत सगळ चुकतंय......
तरी मन रे गुंतत जातं.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

ठरवुन कुठे.....
प्रेमकहाणी घडते.....
नशिबात नसलेल्याच्या मागेच....
वेड मन हे पळते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अनोखी प्रेमकहाणी......

तुझी माझी किती......

तुला गमावण्याची का रे.....

वेड्या मनी भिती......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

खर्या प्रेम कहाणीला.....

अपुर्णत्वाचा रे शाप.......
का नाही करत नियती.....
यांना कधी रे माफ.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तुझ्या ह्दयात वेड्या......
स्पंदन माझी बरं.........
स्वतःला जप नाहीतर......
माझ नाही हं काही खरं......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अनोळखी असुनही......

आपल्यात ते गणणं होतं.....

यालाच का सांग ना......

प्रेम ते म्हणणं होतं.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

शहाजहान मुमताजची.....
अनोखी होती प्रेम कहाणी......
ताजमहाल आहे म्हणतात.....
त्याचिच निशाणि......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

किती प्रेम तूझ्यावर......
शब्दात कस रे मांडणार......
पण, तुझ्यासाठी तूझ्याशिच....
आजन्म मी भांडणार....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तुला गमवण्याच्या भीतीने....
तुझ्याशीच  रूसणं असतं...
वेड्या मनाच कसं.....
तूझ्यात हे गुंतणं असतं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तु क्षणभर रूसला तरी....
श्वास माझा रे गुदमरतो.....
सांग ना कुठली जादू....
मन तुझ्यातच रे हरतो....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अनोखी लव स्टोरी.....
प्रत्येकाची असते.....
कधी व्यक्त तर......
कधी अव्यक्तच असते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

लव स्टोरी ती......
होती म्हणे खास.....

इभ्रतीसाठी दोघांनी.....
गिळला विरहाचा फास....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

भेटणार नाही दोघं......
दुनियादारी जाणुन होते.....
तरीही एकमेकांना....
आपलं ते मानुन होते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

लव स्टोरी ही.....
अनोखीच असते...
पुर्णत्वाची तीची.....
शाश्वती ती नसते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अनोखीच आहे..
आपली प्रेम कहाणी....
दूःख माझे पहाता.....
डोळ्यात तूझ्या  पाणी...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अनोखी लव स्टोरी....
होती दोघांची.....
अव्यक्त असता ही....
कळली प्रित एकमेकांची.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अनोखी लव स्टोरी.....
आहे ना रे आपली.....
न भेटता मन आपण....
आहे ना जपली.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                          शाही....✍️✍️


No comments:

Post a Comment

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...