मजेदार गोष्टीतं.....
पहील्या भेटीचे रे ते किस्से.....
गोड आठवणिंचे.....
न तुटणारे ते हिस्से....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
किचनमध्ये नविन पदार्थ.....
खुपदा ना फसतो......
मजेदार गोष्टीत तो......
मग सगळ्यांच्याच असतो....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
मजेदार गोष्ट.....
ती ही आठवून गेली....
होमवर्क नाही केला की....
वही घरीच विसरुन दिली....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
मजेदार गोष्ट.....
तीही ना छान असते....
ट्रकवरची शायरीही.....
गोड ती हसवत असते...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
खोकला ऐकताच.....
सगळे दुर पळायचे......
करोनाकाळत असेही.....
मजेशिर किस्से घडायचे.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
मजेदार गोष्टींसाठी....
नाही कुणा सवड.....
बदलत चालली.....
प्रत्येकाची आवड.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
मजेदार गोष्ट.....
जेव्हाही घडली......
हसू नका जोरात....
तंबी ही पडली.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
मजेदार गोष्ट.....
तेव्हाही घडते......
न बोलताही मन.....
जेव्हा त्याला कळते.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
मजेदार गोष्ट....
प्रत्येकाच हसु.....
अनोळखीही लागतो....
आपलाच दिसु.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
नाही बोलणार म्हणत....
किती ती बडबड करते.....
मजेदार गोष्ट ही तीची.....
नेहमीच मन हरते....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
मजेदार गोष्ट......
उद्या होती घडणार....
त्याची माझी भेट.....
होती गं ठरणार.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
तुझी बडबड वेडू.....
मजेदारच गोष्ट.....
हरवते गं ती....
दिवसभराचे माझे कष्ट...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
मजेदार गोष्टीत....
निरागसता छान....
सहज हरवते.....
म्हणून ती भान....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
वेडू शब्द शोधत बसला.....
मी डोळ्यांनीच गं बोलून गेली....
मजेदार गोष्ट प्रेमात अशी....
कीतीदा गं घडून गेली....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
मजेदार गोष्टी.......
जपलेल्या मनात.......
हसुआणतात.......
चेहर्यावर क्षणात.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
मजेदार गोष्टी.....
खर ना त्या असतात.....
आपल्या चुकांवरही.....
आई बाबा जेव्हा हसतात.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
निरागसपणात लपली.....
मजेदार गोष्टीची गंम्मत.....
हरवून बसलो की......
देऊन मोठेपणाची किंमत.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
मजेदार गोष्ट.....
मोबाईलची गं छान.....
बडबड माझी ऐकता....
हरवतो वेळेच तो भान......
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
मजेदार गोष्ट....
आहे गं अशी.....
आवडतो बर.....
नभातील शशी.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
आयुष्याची सगळ्यात....
मजेदार गोष्ट.....
बालपण दिसत.....
त्यात स्पष्ट.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
मजेदार गोष्टी......
आठवतात का रे आजीच्या.....
आजही बंद त्या.....
कप्यात मनाच्या....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
स्त्रिच वय न विचारण्यामागे.....
आहे मजेदार गोष्ट.....
ती स्वतःसाठी कुठे.....
जगते हो जास्त......
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
मजेदार गोप्टी.....
आजीच्या भारी......
बोधपर कथेतून.....
शिकवायची दुनियादारी.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
मजेदार गोष्ट.....
अशी कळली....
ती वेडी म्हणे....
प्रेमात पडली.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
मजेदार गोष्टी.....
रंगवते ती छान.....
खर खोट्याची.....
विसरता जाणं.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
मजेदार असतात......
त्याच्या गोष्टी फार....
दडलेले असतात त्यात.....
जीवनाचे सार.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
मजेदार गोष्ट म्हणत....
गुपीतही कुणाची सांगीतली जातात....
खर ना मजेदार गोष्टीचे.....
सोयीचे अर्थ येतात....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
मजेदार गोष्टीत.....
दोष दुसर्याचे दिसतात का?!.....
गोष्टी सारखेच लोक.....
त्यावर मग हसतात का?!.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
मजेदार गोष्टीत.....
निंदाही का मोडते.....
काहींना मात्र.....
गोष्ट ही फार आवडते.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही....✍️✍️
अप्रतिम...👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻💖💖💖💖💖🌹🌹🌹🌹🌹🍫🍫🍫🍫🍫
ReplyDelete