आठवणीतील त्या गाण्यांची....
ह्दयात वेगळी रे जागा.....
आपल्या सुख दुःखांचा....
अलगद जुळतो त्यांच्याशीना धागा....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
नव्या गाण्यातील ....
स्वँग आहे रे भारी....
पण आठवणीतील गाण्यांची....
मधुरताच न्यारी ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
रिमिक्स करता.....
धुन ही बदलून पाहिली.....
जुन ते सोन होतं.....
सल ही मग राहीली....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
आठवणीतील ती गाणी.....
नी लोकरीचे गुंतून गेलेले गोळे....
स्वेटर नाही रे स्वप्न होती वीणलेली....
आठवता पाणवता आजही रे डोळे....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
आज पुन्हा मन....
दाटुन आलयं......
आठवणीतल्या त्या गाण्यातुन....
तूला रे भेटुन आलय....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
विरह वेदनेने भरलं होतं.....
आठवणीतील ते गाणं.....
उगाच आठवुन देतं तूझं.....
अर्ध्यातून ते सोडून जाणं.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
ऐ मेरे वतन के लोगो.....
आजही गाणं हे रडवून जातं....
स्वातंत्र हे बहुमोल किती....
महती याची पटवुन जातं....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
जीवनातील स्वप्न ही....
जेव्हा ही चुरचुर झाली......
आठवणीतील ती गाणी......
सावरायला मग धावुन आली.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
अर्थपुर्ण असायची...
गाणी ती जुनी....
अंताक्षरी खेळता आजही....
आठवतात तीच मनी....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
डोळे पाणवतात..
आणि ओठावर हसू होतं....
आठवणीतील त्या गाण्यात....
तूझ येणं असं होतं....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
वियोगी भुतकाळ.....
की अतुट रे स्नेहबंध.....
आठवणीतल्या त्या गाण्यात.....
भास तुझे मंद मंद.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
दुनियादारी जशी जशी.....
हळुहळु कळत गेली......
आठवणीतील त्या गाण्यांची.....
अर्थ मग वळत गेली......
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
आठवणीतली ती गाणी.....
ऐकते सख्या कधी कधी.....
जेव्हा डोळ्यात तुझ्या विरहाने....
येते आसवांची नदी.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
आठवणीतली ती गाणी.....
गुणगुणली तु किती छान.....
सुर तुझे भिडले मनाला....
विसरले मी वेड्या भान......
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
आठवणीतली ती गाणी.....
कधि पडतात कानी.....
आठवते मला मग वेड्या....
आपली प्रेम कहाणी.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
आठवणीत गेली.....
किती ती गाणी बरं.....
सुर कानावर पडता आजही.....
क्षण ती जीवंत होतात सारी खरं....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
किती अर्थपुर्ण होती....
आठवणीतली ती गाणी....
सांगतात सगळी ती.....
त्या युगाची कहाणी....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही....✍️✍️
No comments:
Post a Comment
Welcome to Shaheen plz. Comments