02 August 2022

चारोळी संग्रह....

प्रेमाचा रंग राजा....
कसाही दिसुदे.....
विश्वास त्यात रे...
हमखास असुदे.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
प्रत्येक फुलावर.....
नसतं रे भाळायचे......
एकनिष्ठेत प्रेमरंग खरा....
कधी रे हे जाणायचे.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

भेटुन तु गेल्यावर.....
पाऊसही गळतो.....
विरह हा सोपा नाही....
त्यालाही रे का कळतो....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

जात पात धर्मात.....

प्रेम कधी का बांधले गेले....

माणुसकीच खरा प्रेमरंग....

सहज किती सांगुन दिले.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

प्रेमरंग खरा......
त्यागातच असावा....
आई बाबांच्या प्रेमात....
तोच तर दिसावा....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अव्यक्त प्रेमाचा रंग.....
आहे तसा खास......
उगाच मनात आहे......
तू माझा असल्याचा भास.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

प्रेमरंग मैत्रीतील.......

असतो खास.......

प्रत्येक नात्यात........

असावा याचा भास....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                          शाही....✍️✍️


नकाराच्या भितीने.....

सांगितले कुठे जाते.....

एकतर्फि प्रेम असे......

आजन्म सल होऊन रहाते......


प्रेमरंग देशप्रेमाचा......

जवानांचा पहावा......

देशासाठी किती सहज.....

बलिदान जीवाचा द्यावा......


प्रेमरंग मातृत्वाचा...

मि काय त्याची महती द्यावी.....

आभाळाचा कागद आणि.....

समुद्राची शाही कमी यास पडावी....



No comments:

Post a Comment

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...