प्रतिशोध घेण्याची.....
मानसिकता रे वाढली.....
क्रिमिनल केसमागची.....
कारण हीच कळली....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
दोन वेळच्या जेवणासाठी....
तो बाल अपराधी झाला होता....
क्रिमीनल केस समाजावर लादण्याचा....
विचार मनात मग आला होता....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
समाजात गुन्हेगाराला.....
पाठींबाच जणु दिला जातो.....
गुन्हा मोठा घडला तरी.....
दोष तीच्या कपड्यांवर लादला जातो.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
जोवर अपराधी.....
निर्दोष होऊन सुटतील.....
क्रिमीनल केस समाजातील....
सांग कशा बर थांबतील....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
क्राइम पट्रोल पाहुन...
अशी ती वागते.....
सगळ्यांना आता....
संशयी नजरेने बघते....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
विश्वासाने विश्वासाचा.....
गळा तो कापला जातो.....
क्रिमिनल केस मध्ये.....
हा गुन्हा का रे मानला जातो....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
दगड जपण्यात......
फुल ती कुस्करली गेली.....
क्रिमिनल केस ही.....
कुठे न नोंदली गेली.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
क्रिमिनल केस नाही....
पण आरसाच छळुन जातो....
नकळत गुन्हा कधी.....
असाही घडुन जातो....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
मन आजही.....
जमानत तुझी देते.....
निश्चित येशिल तु फीरून....
वाट रे मी पहाते....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
कबुल नाही केला त्याने....
प्रेम केल्याचा गुन्हा.....
त्याच्या डोळ्यांनिच दिली......
ग्वाही त्याच्या विरूध्द पुन्हा.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
क्रिमिनल केस करता येते.....
धमकी देणार्यांवर.....
पण हक्क आहे त्यांचा म्हणत.....
नाही घेत ती मनावर.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
क्रिमीनल केसचा तो गुन्हा.....
आजन्माचा दाग. झाला....
कोर्टाने निर्दोष साबित करूनही.....
जगाने माफ नाही केला....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
किती क्रिमिनल केस.....
घडताय समाजात.....
का नाही उरलाय......
कायद्याचा धाक मनात.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
वासनांध नजरेने.....
जणु बलात्कार तीचा होतो.....
क्रिमिनल केस मध्ये सांग ना....
हा गुन्हाही ना येतो...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाब्दीक मार.....
जे मारून गेले......
क्रिमीनल केस मधुन.....
का त्यांना गाळून दिले......
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
चोरी करणार्यांवर......
क्रिमिनल केस ना गं होते......
झोप गं त्याने चोरली माझी.....
सांगना एफ. आय. आर.कुठे दाखल होते....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
खुन करणार्यांवर......
क्रिमिनल केस ना दाखल होते.....
कीती भावनांचा खुन होतो.....
पण केस दाखल कुठे रे ती होते.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
मनानेच माझ्यावर.....
क्रिमीनल केस रे फाईल केली....
मी खुपदा म्हणे त्याला.....
मरण यातना दिली...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
क्रिमिनल केस.....
कुणाविरूध्द लढायची.....
आपलेच दात नि.....
आपलेच ओठ असायची....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
क्रिमिनल केस.....
ती ही का होईल.....
भावनांना जेव्हा....
कुणी छळून जाईल.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
वेडु तु जणु....
भविष्याची आरोळी.....
तूझ्यासाठी गुंफली....
बघ सुंदर रे चारोळी....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही✍️✍️....
अप्रतिम शाही... 💖💖💖💖💖👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🍫🍫🍫🍫🍫
ReplyDelete