20 October 2021

तिमिरातून तेजाकडे... 20-10-2021

तिमिरातून तेजाकडे ....
जायचे ते ठरलेले ....
कवितेत  म गाणे....
प्रकाशाचे रे उरलेले....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
जगण्याच्या  तिमिरातून ....
एकटि ती चाललेली ....
जीवनाच्या कवितेत....
सावल्यांशीच म भांडलेले....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
विरहाच्या  तिमीराला....
कधी न रे जुमानले.....
कवितेत तुला माझ्या....
स्पंदन  माझे मानले....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
झुंडशाही च्या तिमीरात....
विवेकाची न कधी तमा.... 
जागृत असूनही न लढता.... 
करशील का स्वतःला क्षमा ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
सांगणारे शशी  मज .....
तिमिरात  का साथ दिली.... 
सोबतच्या  चांदण्यांची....
मजसाठी तमा तु का  न केली ...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁अहिंसा असो कि अ. नि. स...... 
गोळ्या  त्या डागलेल्या......
प्रगती च्या बाता पहा.....
तिमिरातून तेजाकडे  चालल्या....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
रोहिणी  व्हावी मी तुझी..... 
असं तूला ना वाटायचं.....
शशी होऊन असं का ....
तिमिरातच  तु भेटायचं ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
                             शाही...✍️✍️ 

19 October 2021

गणीत उणे बेरजेचे..... 19-10-2021

तुझ्या, सोबतचा प्रत्येक क्षण ....
मी  जपून ठेवलेला ....
उणे बेरजेच्या खेळातून ....
अलगद  लपवून ठेवलेला....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
उणे बेरीज करता करता .....
एक  सल रे जाणवून गेली..... 
सुटलेल्या हातांना कुठे मांडू.... 
दुनियादारी शिकायची राहून गेली ...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
उणे बेरजेच्या खेळामध्ये .....
खूप  काही ग गमवून बसले.....
आई आली ग बेरजेला.....
बाबांना पण  हरवून बसले ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
एक विचारलं तर ....
खर ना रे सांगशील ....
उणे बेरीज करतांना.... 
मला कुठे मांडशिल...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
उणे बेरजेचे  गणित .....
नाही  रे जमत मला....
तुला बेरीज करुन......
शून्यात धरते मी मला...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
तुझ्या  सोबतच्या क्षणांना.... 
गणीतात  कसं ना, मांडाव .... 
साऱ्या  निरपेक्ष भावनांशी ....
अनोळखी  होऊन कसं ना भांडाव ...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
उन सावल्यांचा हा खेळ .....
सोपा  होता मांडायला..... 
समाधान  धरले  गाठीशी की..... 
काहीच रहात, नाही  गमवायला....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁                          शाही... ✍️✍️

खीडकीतला आभाळ ..19-19-2021

बंधनांच  जग असं....
खीडकीमुळे हरलेल....
कल्पनेच्या पंखांनी....
आभाळ मी रंगलेल....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
खिडकीतून  डोकावणारा शशी.... 
गाली रे हसून  गेला ....
तुच भेटीला आला जणू ....
भास हा ठेऊन  गेला ...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
आज हि तुझ्या  खिडकीत....
पाय वेडे अडलेले ....
दिसावा तुझा  चेहरा ....
डोळे  ग आसुसलेले ...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
आज तो खोडकर वारा ....
बघ ना पून्हा  सतवून गेला.... 
शीळ तुझी  शाही अशी....
पुन्हा  खिडकीत ठेऊन तो गेला ...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
तुच माझा आभाळ..... 
तुलाच  नाही  कळलेलं ....
ऋणानुबंध  असं  तुझ्याशी....
जुळुनही न जुळलेलं ...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
   धुसर  ती नजर....
खिडकीतून  झाकलेली...
पाखर परततील घरट्यात ...
आस ही जागलेली....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
                        शाही... ✍️✍️


18 October 2021

पेल्यातलं वादळ... 18-10-2021

ऐक ना वेडू माझ्या.... 
का तु असा भांडतोस...
गैरसमजांच्या पहिल्या  वादात... 
दुर  कसा रे सारतोस... 
पाहिल का तु कधी... 
माश्याला  पाण्याविन  रहातांना... 
तुझा अबोलाही छळतो मला... 
का विसरतो  भांडतांना.... 
या नयनातील अश्रू तुला..
तारे कधी ना  भासायचे...
रागात का तु  सारे विसरायचे... 
दिसला तुझा लटका राग....
डोळ्यात तुझ्या  हसतांना...
गालावरील  तुझ्या  खळीतुन...
काळजी  घे डोकावताना... 
पहिला  वाद हा प्रेमातला संवाद...
अती नको ना त्याची करूया...
गुण दोषांसकट  चल  ना...
एकमेका मिठी धरूया...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁                         शाही... ✍️✍️

प्रश्न -उत्तर... 18-10-2021

प्रेम  म्हणजे काय ....
प्रश्न  हा अडलेला....
उत्तरात दिसला.... 
आईचा  चेहरा  हसलेला ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
दुनियादारीत  सारे.....
प्रश्न  ते अडलेले .....
मैत्री उत्तर  म्हणताच....
सारे ते गळलेले...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
वीतभर पोटाच्या प्रश्नांवर .....
सारे  जीवन रे अडलेले ....
उत्तराच्या शोधात ....
जगणेच हरवलेले...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
प्रश्न  तुझे  सारे ....
माझ्यावर अडलेले....
माझं उत्तर  तुच....
तुला का कळलेले....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
प्रश्न  असे सारे....
होते ते अडलेले ....
विसंवादाचे तांडव.... 
उत्तरात म्हणे घडलेले ...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
                         शाही...✍️✍️ 



आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...