अनोळखी आहेस तू....
पहाता तुला हायस का रे वाटावं....
दाटलेलं मन रितं कराव....
असं ऋणानुबंध तुझ्याशी का वाटाव....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁.
खुप असते ग आई....
मनात या दाटलेले....
तुझा डोक्यावरून हात फिरता....
हायसे ग म वाटलेलं ...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
उन सावल्यांचा खेळात .....
मन ग दाटत असतं......
अबोल राहणेही कधी कधी.....
अपरिहार्य होऊन बसतं......
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
सांगावा तुझा भेटीचा आला....
आणि हायसं रे वाटून गेलं .....
कसं, सांगाव आठवणीत तुझ्या ....
मन कितीदा दाटून आलं......
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही..... ✍️✍️