अपेक्षांच्या वादळात.....
नको आता अडकायला.....
घडेल काही नविन....
स्वप्नात अशा नको रे रंगायला...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
नवीन काही नाही घडवायचे ....
अशात मला नाही रे अडायचे....
कठीण रे दुनियादारीशी लढणं.....
पण साथ तु नेहमी हं असायचे....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
भुलवणार्या तूझ्या शब्दात......
नाही रे अडकायचे आता .....
नवीन घडायला नको काही ....
ऐकशील हे जाता जाता....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
नविन नको घडायला काही.....
प्रयत्न खूप रे केले ......
नको अडकायला मन तुझ्यात ......
वाटता अडकत तुझ्यात गेले....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
नको वाटतं काहि प्रश्नात अडकायला.....
पण जगणं उगाच त्यात अडकत जातं....
नको काही घडायला म्हणता....
तेच का रे घडत जात....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
नको वाटतं काहि प्रश्नात अडकायला.....
पण जगणं उगाच त्यात अडकत जातं....
नको काही घडायला म्हणता....
तेच का रे घडत जात....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
घडवायचं काही नाही ....
म्हणून अडकायचे नाही....
असे पळवाट शोधून ....
जगायच गं नाही ...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
नाही ग अडकायचं....
नजर कैदेत तूझ्या....
नविन काही घडाव....
असं नशिबी नाही ग माझ्या...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
मला नाही अडकायचे तुझ्यात....
कितीदा ती म्हणते.....
सोडून नाही जाणार ना रे.......
म्हणता मिठीत पडून रडते...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
अडकायचे नाही असं.....
ठरवून कुठे होते......
नविन काही घडणार याच......
आमंत्रण नियती कधी का देते....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही.... ✍️✍️