04 January 2022

दुजोरा देशील... 5/1/2022

देशील का दुजोरा .....
असा तु मला.......
गुण  दोषांसकट......
सरणावर ही जपशील ना मला.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁


हक्कच नाकारले तु नात्यातले.....
कसा रे मी दुजोरा  तो द्यावा......
स्वतःचा म्हणून  जपलं होतं  ज्याला मनात.....
सांगशील शोध  त्याचा कुठे रे  घ्यावा.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कसा न देऊ  दुजोरा ......
तुझ्या  अव्यक्त  त्या राहण्याला......
स्वतः कडे का ठेवते लपवून......
अर्थ  लागू दे चोरून तुझ्या गं  पहाण्याला.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कसा देऊ  दुजोरा.....
गृहीत तूझ्या धरण्याला......
स्वतः  कडे काय  ठेऊ ......
उरलं काय आता हरण्याला.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

शब्दा शब्दात  दुजोरा  देतो  ......
संगतीला तो असण्याचा.......
दुःख  नको  ठेऊ स्वतःकडे....
काळजीला दे गं सांगावा तो   हसण्याचा.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

ठेऊ का आठवांचा थवा....
तूझा रे माझ्या कडे.....
दुजोरा  देऊन सांगशील त्यांना ......
छळू नका तीलाना  गडे....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कसा दुजोरा देऊ ......
छंद  तूला आभाळ गवसण्याचा......
स्वतः  कडे  आता काय ठेऊ केला गैरसमझ .....
तुलाच आपला आभाळ तो समजण्याचा.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

दुजोरा  देण्याईतकी......
खरच का रे मी गणली जाते .....
स्वतः साठी  काय ठेऊ .....
परकी मी दोन्ही  घरी रे मानली जाते...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

दुजोरा  देण्याईतकी......
खरच का रे मी गणली जाते .....
स्वतः साठी  काय ठेऊ .....
परकी मी दोन्ही  घरी रे मानली जाते...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कसा रे दुजोरा  देऊ ......
कुंपणच ईथे शेत खाते.....
स्वतः  कडे काय ठेऊ.....
स्वार्थाचे जगणे कुठे रे येते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                      शाही.... ✍️✍️


03 January 2022

दुजोरा.... 3/1/2021

अनुभवांची शिदोरी ....
सोबतीला असता.....
नविन सुरूवात कर....
हसता हसता....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

सांगना नियती
देशील का ग दुजोरा
मला तु नेहमी .....
खूप  काही  नको गं
दुःख करशील
थोडे  से कमी....
नाही  गं दूखवावे
मन माझ्या  आपल्यांच
अपेक्षांची त्याच्यांकडून
नसावी ग मला हमी.....
प्रयत्नांना माझ्या
यश गं कमी
नको व्हावी  कधी
सल माझ्या  मनी....
स्वतः  साठी  आता
काय गं मागावे
माझ्या  आपल्यांचे सुख
नेहमी तु जपावे....
तु फक्त, सोबतीचा
भास मला दे
जिंकून  दाखवेल
अशी गोड आस मला दे....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                                   शाही.... ✍️✍️  


नविन सुरूवात.... 3/12/022

ग्रहण तुला लागता चंद्रा.....
वाईट तुला वाटते  ना रे......
सांगना अनुभव तुझा, सुरवात......
नविन करतांना मन तुझं ही दाटते का रे.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अनुभवांची शिदोरी .....
खूपदा गं दंव्दात  पाडते....
भुलवणार्यांपासुन सावध रहा म्हणतांना....
मन का तिथेच गं अडते...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

बंधनांच जग  ही महत्वाच.....
अनुभवांची शिदोरी  सांगेल गं तुला.....
नविन सुरूवात करतांना .....
मनात तरी जपशील ना मला.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नाविन्याची ओढ ही....
मानवी रे वृत्ती....
अनुभवांच्या शीदोरीने.....
घडेल योग्यच रे कृती.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नाविन्याची ओढ ही....
मानवी रे वृत्ती....
अनुभवांच्या शीदोरीने.....
घडेल योग्यच रे कृती.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आशावादी असावं रे......
नविन सुरूवात करतांना.....
अनुभवांची शिदोरी सांगून गेली ......
थांबवण अशक्य  तुला म जींकतांना......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तजवीज  करून ठेवावी रे......
उन सावल्यांच्या खेळात......
अनुभवांची शिदोरी  सांगून गेली......
नविन वळण नकळत येत रे जीवनात ....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नविन सुरूवात  करायची......
रंग  त्यात तु भरशील का रे.....
अनुभवाच्या शिदोरीतली......
कडवट अनुभव पुसशील ना रे......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अंगणात होती हसरी......
नविन कळी उमलणारी.......
आपलेच कुस्करुन टाकणार....
भीतीचे अनुभव  होती अशीही छळणारी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

संस्कारांच्या शीदोरीला गं.....
जीवनाचा पाया केलेला.....
नविन सुरूवात  कठीण असताही.....
कल जिंकण्याकडेच म गेलेला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                    शाही.... ✍️✍️


02 January 2022

झाले गेले सारे.... 2/1/2022

विसरून जात जा गं....
झालं गेलेलं......
क्लेश मनी ठेऊन ....
भलं कुणाचं का झालेलं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

झाल गेलं  सोडून  देऊ......
चुकलं कुठे  कळायला हवं.....
क्लेश देऊन एकमेकांना ......
नको रे आता छळायला हवं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

सर्वच  प्रश्नांची उत्तरे ......
सोडवून कुठे सुटतात....
कधीकधी सोडुन देण्यात.....
हित नात्यांचे घडतात....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁


नविन वर्षाची.....
भेट मला देशील का....
झाल गेलं विसरून....
माझा तु होशील का....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

एकदा संवादातून .....
गैरसमज दूर केलेले....
झाले  गेलेले  असे....
कितीदा सोडून  दिलेले....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

झाले गेले सारे .....
मी कुठे रे जपलेले.....
क्लेश होऊन आहे का.....
मनात तूझ्या लपलेले.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

क्लेश कुठे धरले.....
सोडले की क्षणात.....
सारे माझे म्हणता....
चुक आली ध्यानात ....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

झाले गेले  सारे .....
सोडून  द्यायचे रे होते.....
ईतके तरी तू.....
समजून  घ्यायचे ना होते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मी आहे गं वेडू....
शब्द  तुझे कानी पडतात....
क्लेश सारे  असे....
क्षणात रे  गळतात.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                             शाही... ✍️✍️


जमेल असं वाटतं नाही... 2/12/022

उगारतील बोट तुझ्यावर...
जमणार नाही  म्हणून ....
वारसा तूला संघर्षाचा....
प्रयत्न  नको आता थांबून....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तूझ्या आठवांचा पाऊस.....
आला  होता  भेटीला.....
सांगशील त्याला आता.....
जमणार नाही  तस रे भीजायला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

सूर्य  तु  रे माझाच......
जमणार नाही  असं का ते म्हणायचं.....
जाणतो ना उगवग्यासाठी.....
क्षणभर अस्ताला अपरिहार्य ते  जाण्याचं.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कधी कधी  ऊनसावल्यांच्या खेळात....
नैराश्य  ग दाटून येतो ......
जमणार नाही  काही  वाटत असतांना....
प्रयत्न  ही हरून  जातो ....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

जमेल असं वाटतं नाही .....
तीला रे ते समजून  घेणं.....
प्रयत्नांना तीच्या असतच की...
नेहमी ते गृहीत धरणं...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

सगळ्यांचे मन जिंकायचे  होते....
जमेल असं वाटतं नाही .....
फायद्या तोट्याच्या दुनियादारीत......
प्रयत्नांना ही  दिशा   मिळत नाही ....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मागे फिरणं जमेल.....
असं रे वाटत  नाही .....
अनुभवांच होकायंत्र आहेना  सोबत....
प्रयत्नांच्या दिशा ही आता रे चुकत नाही ...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

जमेल असं वाटत नाही ....
तुझ्याशिवाय जगणं.....
प्रयत्न  आता प्रत्येक दुआ त.....
असतं तुलाच मागणं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

विश्वासघात करणार्‍यां बरोबर ....
जमेल अस वाटत  नाही ....
प्रयत्नांना दिशा मिळाली  तरी....
विश्वास  आता  पटत नाही ....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

प्रयत्नांना दिशा  मिळाली  नाही  तर.....
मार्ग  रे बदलावा......
जमणार नाही  असं म्हणून .....
प्रश्न   का तो टाकावा....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

जमेल असं वाटत  नाही .....
हा झाला मनाचा  खेळ  रे.....
प्रयत्नांना दिशा तुला रे द्यायची .....
मिळत नाही  दिशा म्हणण्याची नको वेळ रे....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

भेट  आपली जमेल......
अस नाही  रे वाटत.....
प्रयत्नांना दिशा ....
नाही रे सापडत...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                            शाही.... ✍️✍️


आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...