07 January 2022

चारोळी संग्रह... 7/12/021

दुःखाचे  रुप.....
किती ते फसवे......
तुझी सल होऊन  छळतात....
जुनीच ती आसवे.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

दुःखाचे  रुप.....
किती ते फसवे......
तुझी सल होऊन  छळतात....
जुनीच ती आसवे.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

दुःखाचे  रुप.....
किती ते फसवे......
तुझी सल होऊन  छळतात....
जुनीच ती आसवे.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

दुःख  ते दूःख.....
फसवे का लटके नाही  रे मज कळले....
गणीत त्यांचे मांडता....
आसवे आजही आपसुकच होते गळले....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अपेक्षाभंगांचे फसवे दुःख ......
अपुर्णत्वाचाच शाप त्याला......
जुन्या  आसवांना  गळतांनाही.....
का नाही  याचा भास झाला .....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तिच आणि  आसवांच.....
नातं ते जुनचं.....
सुख असो कि दूःख.....
ठरलेल त्यांच ओघळणंच....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अव्यक्त  प्रेमाचं दुंख.....
किती ना ते फसवे.......
ओढ त्यालाही असेल भ्रमात......
गळतात आजही जुनीच आसवे.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

रूप बदलून फसवण्याची दुःखा....
दुनियादारी  तुलाही जमते.....
जुन्या  आसवांना खेळी  तुझी....
कुठे रे ती कळते.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

जुनीच आसवे माझी......
दुःखाचे रुप  ही ना रे फसवे.....
भेटता का गळली होती......
कळली का तुला तुझी रे ती आसवे.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                   शाही.... ✍️✍️


06 January 2022

मनःपूर्वक आभार 🙏🙏🙏🙏

ऋणानुबंध  काय ते......
तुमच्या  मुळे कळले.....
चार ओळींच्या  चारोळीतुन....
नाते घट्ट जुळले......

           अल्पावधीतच  5000 views झाले. माझ्या  काव्यपुष्प  परीवारातील सर्व सदस्य  आणि लिपी परीवारातील   सर्व  सदस्य,  SSKP -group  मधील बाल मित्र मैत्रिणी, माझे आप्तस्वकीय  आणि  आदरणीय सोनू मामा  आणि  त्यांच्या  मित्र परिवार  आपण सर्वांचे मनःपूर्वक  आभार. आपल्या धावपळीच्या  जगण्यात  ही वेळात वेळ काढून  आपण माझं साहीत्य  वाचतात. या अमूल्य  सहकार्यासाठी  खूप खूप धन्यवाद. आपली साथ म्हणजे  जणू कस्तुरी  सतत दरवळणारी. ही साथ  अशीच  रहावी अशी अपेक्षा  आणी हक्काची विनंती...... 🙏🙏🙏🙏🙏😊😊😊😊 
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
                             शाही.... ✍️✍️ 

05 January 2022

आभाळमाया.. माई

शब्दात  कसं ना बांधाव.....
माईंंच मायाळू रूप......
शब्द  ही होते नतमस्तक ......
म्हणे कठीण आम्हा  खुप .....

परीस्थितीला दोष देऊन ......
लढणं सहज गं टाळलं जातं.....
जीवनी माई तुझी पहाता....
जगण्याचा अर्थ  लागून जातो....

नभातील  तारा की.......
काट्यावरील  फुल म्हणू......
आई तु अनाथांची .......
आभाळमाया कशी गणू.....

जात, शिक्षण, संस्कार...
सारं खोटं वाटतं......
परीस्थिती  खरा गुरु.....
तुला जाणता वाटतं.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                          शाही.... ✍️✍️

जुनीच आसवे... 5/1/2021

जुनीच माझी आसवं......
म डोळ्यातुन तूझ्या का गळतात....
फसवे सारेच दुःख माझे.....
सांगना तुला का रे छळतात....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नको रे डोळ्यांवर.....
पापण्यांचे पहारे.......
जून्या आसवांना आता.......
मुक्याने वाहू देऊ का रे.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आसवे जुनी
किती गं छळतात
हो कळतात

आसवे जुनी
पापणीत लपली
मने जपली

आसवे जुनी
तुझीच ना रे भेट
जपली थेट

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

वयपरत्वे ते दुर्लक्षित  करणं.....
फसवं हे दुःख  छळत  रे किती.....
फेरा हा चुकणार नाही  कुणाला.....
जुन्या आसवांनी  गळून सांगावे तरी किती......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

दुःख  ते दूःख.....
फसवे का लटके नाही  रे मज कळले....
गणीत त्यांचे मांडता....
आसवे आजही आपसुकच होते गळले....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आई मी सुखात गं.....
नजर चुकवून  ती बोलुन गेली....
फसव्या या दुःखाने तीने......
जुनीच आसवे गोठवून दिली....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अपेक्षाभंगांचे फसवे दुःख ......
अपुर्णत्वाचाच शाप त्याला......
जुन्या  आसवांना  गळतांनाही.....
का नाही  याचा भास झाला .....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                           शाही... ✍️✍️


04 January 2022

दुजोरा.... 4/1/2022

कसा मी दुजोरा देऊ .....
वेड्या रे या दुनियादारीला.....
तु माझा नाही  होणार......
सांगता ते येऊन क्षण क्षणाला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

दुजोरा  दिला  त्याने.....
आज हळू येऊन.....
जाईल गं म्हणे स्वतःला .....
तुझ्याकडे ठेऊन.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तूझी काळजी मी.....
स्वतः कडे ठेऊ का....
दुजोरा  देशील.....
हक्क असा घेऊ  का....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कसा देऊ ना दुजोरा  या वेड्या मनाला .....
स्वतः कडे तुला जपायचे म्हणतो....
तु तर नभातला चंद्र .....
हा वेडा तुझ्यातच रे रमायच  म्हणतो....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

 ठेऊ तो क्षण स्वतःकडे.....
जो तूझा माझा होता.....
दुजोरा  नाही  दिला त्यानेही.....
तूझ्याशीवाय तो ही भांडला होता...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

काय ठेऊ  स्वतःसाठी.....
आपल्यात रमण्याची मला रे खोड.....
कसा ना  देऊ दुजोरा मनाला.....
त्याला लागली एकांताची रे ओढ.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

सोडून  जायचं तू......
आणी मी दुजोरा देऊ......
स्वतः कडे सांगशील......
श्वास  गेल्यावर मी काय ठेऊ....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कसा पाठिंबा  द्यावा बर.....
चुकीच्या  त्या वागण्याला....
धुम्रपान  करतो तो......
अर्थ  नाही  अशा जगण्याला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

त्याचा आनंद  कशात.....
कळत नाही  बोलून गेला....
दुजोरा  कसा न देऊ.....
जीव असा तो जाळून गेला ....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

माझ्या  प्रत्येक  कामात .....
दुजोरा  तुझा हवा.....
कळला नाही  हा, कायदा....
माझ्यासाठी का हवा....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                              शाही... ✍️✍️


आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...